“अनंत गीतेंचे म्हणणे १०० टक्के खरे, शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:55 PM2021-09-23T13:55:40+5:302021-09-23T13:56:44+5:30
नारायण राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अनंत गीते यांना पाठिंबा दर्शवला आहे.
मुंबई: काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला आहे. शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही, असे वक्तव्य माजी केंद्रीयमंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी अलीकडेच केले आहे. यावर राजकीय स्तरावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. आरोप-प्रत्यारोपही झाले. यात आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली असून, अनंत गीते यांचे म्हणणे १०० टक्के खरे आहे. शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका केली आहे. (bjp narayan rane react over shiv sena anant geete statement over ncp and sharad pawar)
“काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला”; रामदास आठवले यांचा खुलासा
एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून, दुसरीकडे राष्ट्रवादीने अनंत गीतेंवर टीका करत ते अडगळीतले नेते असल्याचा टोला सुनील तटकरे यांनी लगावला. यातच आता नारायण राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत अनंत गीते यांना पाठिंबा दर्शवला आहे.
“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा
गीतेंनी मांडलेला मुद्दा वास्तववादी आहे
अनंत गीते यांनी मांडलेला मुद्दा वास्तववादी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची तडजोड पदांसाठीच झाली आहे. यामध्ये हिंदुत्वाचा आणि निष्ठेचाही भाग नाही. शिवसेनेने तर मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्त्वाला मूठमाती दिली. त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही, अनंत गीतेंनी सांगितले ते १०० टक्के खरे आहे, असे सांगत गीतेंवर होणाऱ्या पक्षांतर्गत कारवाईबाबत बोलताना राणे म्हणाले की, अजून काय वाकडे करू शकतात. अनंत गीते यांची जी अवस्था आहे तीच शिवसैनिकांची आहे. कोणीच त्यांना विचारत नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते झी२४ तासशी बोलत होते.
“अजितदादांना शरद पवारांमुळेच राजकारणात संधी, ते मोठे नेते नाहीत”; भाजपचा टोला
दरम्यान, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का? एकमेकांचे कधी जमत होते का? यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापि होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. सरकार महाविकास आघाडीचे आहे, शिवसेनेचे नाही, असे अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.