आव्हाडांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याने भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; 25-30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:02 PM2022-01-05T15:02:37+5:302022-01-05T15:02:51+5:30

यावेळी पोलसांनी आंदोलनासाठी आलेल्या भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या शिवाय, आव्हाडांच्या घरी आधीच 60 ते 70 कार्यकर्ते नगरसेवक, शहर अध्यक्ष उभे आहेत.

BJP-NCP clash over Awhad's controversial statement about OBC; 25-30 activists in Police custody | आव्हाडांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याने भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; 25-30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

आव्हाडांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याने भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; 25-30 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Next

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याने काही राजकीय पक्ष आणि ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. यानंतर आपल्या निवासस्थानी पुण्यातून मोर्चा येणार असल्याचे ट्विटही आव्हाडांनी केले होते. यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आव्हाडांच्या निवस्थानी जमल्या होत्या. त्यांनी आव्हाडांच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच अडवून निवास स्थानापासून दूर ठेवले. यावेळी पोलसांनी आंदोलनासाठी आलेल्या भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या शिवाय, आव्हाडांच्या घरी आधीच 60 ते 70 कार्यकर्ते नगरसेवक, शहर अध्यक्ष उभे आहेत.

 नेमकं प्रकरण काय?
जितेंद्र आव्हाड यांनी 2 दिवसांपूर्वी ठाण्यातील जाहीर सभेत ओबीसी समाजबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती, मात्र काल आव्हाड यांनी पुन्हा सांगितले, की ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत. इतिहास कोणी बदलू शकत नाही, यामुळे आज त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येतोय, 2 बस भरून पुण्यातून माणसे येणार आहेत, असे आव्हाड यांनीच ट्विट करून सांगितले. यानंतर पोलिसांनी बंदोबस्त लावला.

Web Title: BJP-NCP clash over Awhad's controversial statement about OBC; 25-30 activists in Police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.