Join us

"आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:13 AM

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. त्यानंतर पार्थ यांच्या या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं असं भाजपाचे नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे. 

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?" असा सवाल देखील निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.

आमदार नितेश राणे यांनी पार्थ पवार यांचे कौतुक केले आहे. 'आज परत सांगतो, पार्थ लंबी रेस का घोडा है... थांबू नकोस मित्रा!' असे ट्विट नितेश यांनी केलंआहे. दरम्यान, पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत आपली भूमिका महाविकास आघाडी सरकारसोबत नसल्याचे कृतीतून दाखवून दिलंय. पार्थ यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. तर, जय श्रीराम म्हणत राम मंदिराच्या भूमिपूजनाचे उघडपणे समर्थन केले होते.  

शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यासोबत, पार्थ यांनीच याबाबतची मागणी केल्याचं सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर आहे, असेही त्यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : चिंता वाढली! 5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या महिलेला पुन्हा लागण, डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण

Video - "स्वदेशीचा अर्थ विदेशी वस्तूंवर सरसकट बहिष्कार टाकणं नाही"

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण, चिंताजनक आकडेवारी

सलाम! विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने केला तब्बल 100 किमीचा प्रवास, 13 गावांतील मुलांना दिली पुस्तकं

कडक सॅल्यूट! ...अन् गर्भवती महिलेसाठी आमदार ठरले देवदूत, डॉक्टरांच्या अनुपस्थितीत केली प्रसूती

बापरे! बाईक दिली नाही म्हणून 'तो' 100 फूट उंच विजेच्या खांबावर चढला अन्..

Corona Vacine : 20 वर्षांपासूनच्या शोधाची कमाल; रशियाकडून SputnikV वेबसाईट लाँच

भयंकर! धावत्या बसने अचानक घेतला पेट; 5 जणांचा होरपळून मृत्यू, 27 जण जखमी

टॅग्स :निलेश राणे शरद पवारपार्थ पवारसुशांत सिंग रजपूतराम मंदिरभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस