“मलिकांनी हिट विकेट केला, आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार”; नितेश राणेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 06:34 PM2021-11-01T18:34:54+5:302021-11-01T18:39:22+5:30

नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

bjp nitesh rane replied nawab malik over devendra fadnavis criticism | “मलिकांनी हिट विकेट केला, आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार”; नितेश राणेंचा इशारा

“मलिकांनी हिट विकेट केला, आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार”; नितेश राणेंचा इशारा

googlenewsNext

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यानंतर आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत असून, अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले आहे. या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनीही पलटवार केला असला तरी भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया व्यक्त करत नवाब मलिकांनी हिट विकेट केला, आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार, असा खोचक टोला लगावला आहे. 

नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. मलिक यांनी ट्विटरवरुन अमृता फडणवीसांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा केला आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून, नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. 

आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार

नवाब मलिकांनी हिट विकेट केला. आता देवेंद्र फडणवीस ‘मौके पे चौका’ मारणार. हम जहां खड़े होते हैं..लाइन वहां से शुरू होती है.. ये याद रखना मलिक!!, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. दुसरीकडे, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले असून, मलिक यांनी आता लवंगी फटाका लावला आहे, दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणाऱ्या परिणामाची काळजी करावी. पण, यामध्ये भारतीय जनता पक्षाला ओढण्याचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 
 

Web Title: bjp nitesh rane replied nawab malik over devendra fadnavis criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.