मुंबई : दिंडोशीत भारतीय जनता पक्षाच्या युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर झालेला चाकूहल्ला हा व्हॉट्सअप ग्रुप सोडल्याच्या कारणावरुन झाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी घडलेल्या घटनेमध्ये भाजयुमोचे उत्तर मुंबईचे अध्यक्ष संदीप उपाध्याय व उपाध्यक्ष प्रकाश वखाणी गंभीर जखमी झाले असून त्यांनी प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी भाजप कार्यकर्ता सचिन पांडे आणि त्याच्या चार मित्रांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस जाणीवपूर्वक तपासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे. उपाध्याय यांच्यावर मालाडमधील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांनी सांगितले की, माझे पांडेबरोबर वाद झाल्याने मी व्हॉटसअप ग्रुपमधून बाहेर पडल्यावर पांडेने भेटण्यासाठी बोलावले. त्या भेटायला गेलो असता त्यांनी चाकूने हल्ला केला. (प्रतिनिधी)
भाजपा पदाधिकाऱ्यावर व्हॉट्सअपवादातून हल्ला?
By admin | Published: March 22, 2016 3:52 AM