Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:12 PM2022-08-16T15:12:59+5:302022-08-16T15:13:19+5:30

Maharashtra Political Crisis: सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरले असले तरी यंदा याला छेद देण्याचे काम भाजपने केले आहे.

bjp organised dahi handi festival in shiv sena aaditya thackeray worli constituency | Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

Next

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis)  यांचे नवे सरकार आले. यानंतर भाजपने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत केले असून, भाजप मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे (Dahi Handi 2022) आयोजन केले आहे. या खेळीने आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपने मुंबई महापालिका निवडणुकांच्या मोर्चेबांधणीची सुरुवात युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरळीतील कोळी बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. 

जांबोरी मैदान पटकावून सचिन अहिर यांच्यावर मात

शिवसेना नेते आणि आमदार सचिन अहिर दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरलेले आहे. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वांत आधी जांबोरी मैदान पटकावून अहिर यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू करण्यात येत आहे. जांबोरी मैदानाच्या सुशोभीकरणावर महापालिकेने अलीकडेच जवळपास २ कोटी रुपये खर्च केले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या आयोजनामुळे तो खर्च वाया जाऊ नये यासाठी तिथे उत्सव साजरा न करण्याची भूमिका घेतल्याचा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आहे. आदित्य ठाकरे हे वरळीतून निवडून आले आहेत. तर वरळी परिसरातच राहणारे सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे आमदार आहेत. या परिसरातील खासदार शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा याच परिसरातील आहेत. शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक वरळीतच राहतात. असे असतानाही भाजपने जांबोरी मैदान पटकावण्यात यश मिळवले आहे. आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. 
 

Web Title: bjp organised dahi handi festival in shiv sena aaditya thackeray worli constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.