Join us

भाजप : आमचा पक्ष नंबर वन, राष्ट्रवादी : बिगरचिन्हाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 7:02 AM

चिन्हांवर न लढलेल्या ग्रामपंचायत, निवडणूक निकालावरून दावे-प्रतिदावे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील ५४७ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. थेट सरपंचांसह झालेल्या या निवडणुकीत भाजपच नंबर वनवर असल्याचा दावा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला, तर पक्षचिन्हावर न लढलेल्या निवडणुकीत असा दावा करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेस  व राष्ट्रवादीने केली आहे. 

बावनकुळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात दावा केला आहे की, ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायती (भाजप २५९, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट ४०) भाजपने जिंकल्या. प्रत्यक्षात ५४७ ग्रामपंचायतींमध्येच निवडणूक झालेली होती. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून भाजपला २७४ ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचे म्हटले आहे. बावनकुळे आणि उपाध्ये यांनी भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायतींबाबत वेगवेगळी आकडेवारी दिली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला जनतेने स्पष्ट कौल दिला. २९९ ठिकाणी युतीचे सरपंच जिंकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. ५० टक्क्यांहून जास्त सरपंच हे आमच्या युतीचे जिंकले आहेत.    - चंद्रशेखर बावनकुळे,     प्रदेशाध्यक्ष, भाजप

ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढविल्याच जात नाहीत, तर मग आमचाच पक्ष नंबर वन, असा दावा भाजप कोणत्या आधारावर करत आहे? हा दावा हास्यास्पद आहे.     - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

ग्रामपंचायत निवडणुकीत नंबर वनवर असल्याचा दावा निराधार आहे. मागेही ते असेच बोलले होते आणि मग आम्ही कोणत्याच पक्षाशी संबंधित नाही, असा खुलासा बऱ्याच सरपंचांनी केलेला होता.

ग्रामपंचायतींमध्ये माेठा विजय मिळाल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. १६ जिल्ह्यांमधील ५४७ ग्रामपंचायतींसाठी १८ सप्टेंबरला मतदान झाले होते.     - नाना पटोले; प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसमुंबईभाजपाजयंत पाटीलनिवडणूक