Join us  

विमाननगरात भाजपाची मुसंडी

By admin | Published: February 24, 2017 3:24 AM

नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३, ४ व ५मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारून राष्ट्रवादीला

चंदननगर : नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३, ४ व ५मध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारून राष्ट्रवादीला आस्मान दाखवले. भाजपाने १२ पैकी ८ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले.प्रभाग क्र. ३ विमाननगर-सोमनाथनगर प्रभागात भाजपाचे चारही उमेवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विमाननगर प्रभाग क्र. ३ मधून एकूण ३१,७२९ मतदान झाले. अ गटातून भाजपाचे राहुल कोंडीराम भंडारी यांना १२,८७१ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे आनंद सरवदे यांना ९,४५१ मते मिळाली. काँग्रेसचे रमेश सकट यांना ३,००१ मते मिळाली. शिवसेनेचे भीमराव खरात यांना ३,८७५ मते मिळाली. मनसेचे नीलेश गायकवाड यांना ७७१ मते मिळाली. या ठिकाणी ९९४ जणांनी नोटाचा वापर केला. या ठिकाणी भाजपाचे राहुल भंडारी हे ३,४२० मतांनी विजयी झाले.ब गटातून भाजपाच्या महिला उमेदवार श्वेता गलांडे-खोसे यांना १२,३८९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उषा कळमकर यांना ११,१४४ मते मिळाली. काँग्रेसच्या कविता शिरसाट यांना ३,६०१ मते मिळाली. शिवसेनेच्या संध्या खेडकर यांना ३,०७४ मते मिळाली. अपक्ष लता मेरगळ यांना ५९१ मते मिळाली. नोटा मताचा वापर ९६० जणांनी केला. या ठिकाणी भाजपाच्या श्वेता गलांडे या १,२४५ मतांनी विजयी झाल्या. क गटातून भाजपाच्या मुक्ता जगताप यांना १२,८८४ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या सुरेखा खांदवे यांना ८,४७९ मते मिळाली. शिवसेनेच्या वैशाली चांधरे यांना ४,३४० मते मिळाली. काँग्रेसच्या सागरताई रोकडे यांना ३,३४४ मते मिळाली. भारिपच्या रेखा बनसोडे यांना १,२३० मते मिळाली. अपक्ष मंदा खुळे यांना २७८ मते मिळाली. तर, नोटाचा वापर ११८३ जणांनी केला. या ठिकाणी भाजपाच्या मुक्ता जगताप या ४,४१४ मतांनी विजयी झाल्या.ड गटातून भाजपाचे कर्णेगुरुजी यांना १३,१०५ मते मिळाली. राष्ट्रवादीचे रमेश आढाव यांना ८,७०५ मते मिळाली. शिवसेनेचे प्रीतम खांदवे यांना ४,१६७ मते मिळाली. काँग्रेसचे भुजंग लव्हे यांना २,९३२ मते मिळाली. मनसेचे मोहनराव शिंदे यांना ६३५ मते मिळाली. बसपाचे राहुल बोडरे यांना ८६६ मते मिळाली. नोटाचा वापर ७०९ जणांनी केला. या ठिकाणी भाजपाचे बापूराव कर्णेगुरुजी हे ४,४०० मतांनी विजयी झाले. (वार्ताहर)