“नवाब मलिकांचे डोके ठिकाणावर आहे का, रोज आरोप करण्याची नशा लागलीय”: प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 07:46 PM2021-11-01T19:46:35+5:302021-11-01T19:47:26+5:30

नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. 

bjp pravin darekar criticized nawab malik over allegation over devendra fadnavis | “नवाब मलिकांचे डोके ठिकाणावर आहे का, रोज आरोप करण्याची नशा लागलीय”: प्रवीण दरेकर

“नवाब मलिकांचे डोके ठिकाणावर आहे का, रोज आरोप करण्याची नशा लागलीय”: प्रवीण दरेकर

googlenewsNext

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून (Mumbai Cruise Drug Case) महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप केल्यानंतर आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोर्चा वळवल्याचे पाहायला मिळत असून, अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले आहे. या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यातच भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नवाब मलिकांवर टीका करत नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज आहे. तसेच एखाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले आहे. 

नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, रोज ड्रग्ज घेतल्यावर नशाबाज जसे खोटेनाटे आरोप करतात तसेच रोज आरोप करण्याची नशा त्यांना लागली आहे, अशी टीका केली आहे. 

मलिकांनी केलेले आरोप हे केवळ वैफल्यातून

नवाब मलिक यांचा चेहरा व देहबोली पाहिली तर ते वैफल्याने पूर्णपणे ग्रासलेले दिसत आहेत. म्हणूनच ते भाजप व भाजपच्या नेत्यांवर अशी बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका टिप्पणी केली आहे. महिलांच्या संदर्भात व एखाद्याच्या कुटुंबियांवर टीका करताना त्यांची किळसवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली. 

नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा

संविधानाच्या चौकटीमध्ये एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाशी द्वेष भावनेने वागणार नाही, असूया करणार नाही. जातीपातीच्या संदर्भात माझी भूमिका न्याय्य असेल, अशी शपथपूर्वक सांगतो, ही संविधानाची चौकट आहे. पण या चौकटींचे उल्लंघन नवाब मलिक यांच्याकडून होत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा केविलवाणा अट्टहास सुरू आहे. ते दलित आहेत की मुस्लिम आहेत हे सिद्ध करण्याचा प्रकार आतापर्यंत कधीच झाला नव्हता. हे त्या पदाला शोभा दणारे नाही. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते, मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणाऱ्या परिणामाची काळजी करावी. पण, यामध्ये भारतीय जनता पक्षाला ओढण्याचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे परिणाम खूप भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. 
 

Web Title: bjp pravin darekar criticized nawab malik over allegation over devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.