Hindu Vote Bank: “हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 01:47 PM2021-12-15T13:47:16+5:302021-12-15T13:49:00+5:30

Hindu Vote Bank: हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

bjp pravin darekar replied shiv sena sanjay raut statement chandrakant patil on hindu vote bank | Hindu Vote Bank: “हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

Hindu Vote Bank: “हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय”; प्रवीण दरेकरांचा पलटवार

googlenewsNext

मुंबई: गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात हिंदू व्होट बँकेचा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका विधानाला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावला आहे, या शब्दांत प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. 

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू व्होट बँकविषयी केलेल्या विधानानंतर हा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. यावरून शिवसेना नेत्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनार्थ अन्य भाजप नेत्यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. देशात हिंदू व्होट बँकेचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मांडला होता, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे. ते मीडियाशी बोलत होते.

हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलाय

हिंदुत्वाची प्रखर जाणीव नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी मिळवून दिली. हिंदुह्रदयसम्राट म्हणून देशभरात त्यांना नावलौकिक मिळाला यात दुमत असण्याचे कारण नाही. म्हणून हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन बाळासाहेबांनी भाजपासोबत युती केली. दुर्दैवाने नंतर हिंदुत्वाचा विचार सोडून दिला गेला. ज्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून सत्ता बनवण्यापर्यंत मजल गेली. म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. 

व्होट बँकेचा अर्थ शब्दश: घेऊ नका

व्होट बँकेचा अर्थ शब्दश: घेऊ नका. एका विचारधारेला मानणारा एखादा वर्ग असाच त्याचा अर्थ होतो. छत्रपतींच्या विचारांना मानणारा वर्ग असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. त्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची दरेकर यांनी पाठराखण केली. 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील

तिकीट पक्षाचे असते त्यामुळे माझे तिकीट कापले हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचे असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचे कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडेसे उपयोगी पडते. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
 

Web Title: bjp pravin darekar replied shiv sena sanjay raut statement chandrakant patil on hindu vote bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.