मुंबई - राहुल बाबा मोदींना साडे चार वर्षांचा हिशोब मागतात, जनता तुम्हाला चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे. शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावर राहुल गांधी बोलतात असे म्हणत अमित शाह यांनी राहुल गांधीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली. यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, भाजप आरक्षण कधीच बंद करणार नाही, तसा कुणी प्रयत्न केला तरी तो यशस्वी होऊ देणार नाही.
भाजपाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.
अमित शाह यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -
- मोदी लाट आल्यामुळे सगळे एकत्र आलेत
- केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, दोन्ही सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही
- 2019 ची निवडणूक आश्वासनांवर जिंकणार नाही, मोदी सरकारने केलेल्या कामावर निवडणूक जिंकणार
- मोदींनी सब का साथ, सब का विकास या सूत्रानुसार काम केलं
- पक्षाची सुरुवात 10 सदस्यांनी झाली होती, आज अकरा कोटी सदस्य आहेत
- भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं, पक्षासाठी संघर्ष केला