भाजपा ३० जागांवर युती करण्यास तयार

By admin | Published: May 25, 2015 10:47 PM2015-05-25T22:47:42+5:302015-05-25T22:47:42+5:30

५१ जागांचा आग्रह सोडून शिवसेना देईत तेवढ्या जागांवर वसई-विरार महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपा तयार झाली आहे.

BJP is ready to form a coalition of 30 seats | भाजपा ३० जागांवर युती करण्यास तयार

भाजपा ३० जागांवर युती करण्यास तयार

Next

वसई : ५१ जागांचा आग्रह सोडून शिवसेना देईत तेवढ्या जागांवर वसई-विरार महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपा तयार झाली आहे.
महापालिका क्षेत्रात नाव घेण्याजोगे कोणतेही संघटन नाही. या परिसरात म्हणजे नालासोपारा आणि वसई यात कधीही तुमचा आमदार निवडून आला नाही, तुमचा एकच नगरसेवक आहे. इथे पंडितांच्या रुपाने जो युतीचा आमदार आला त्यात सारी ताकद शिवसेनेची, श्रमजीवी संघटनेची होती. तिला बविआ, काँग्रेस, राष्ट्रवादी वगळता इतर पक्षांची मिळालेल्या मतांची होती. त्यात भाजपाच्या मतांचा हिस्सा नगण्य होता. ज्या चिंतामण वनगांच्या पालघरच्या खासदारकीच्या मतांच्या जोरावर आपण उड्या मारत आहात त्यातले सत्य समजून घ्या. ज्या काही जागा देतो आहोत त्यावर समाधान माना नाही तर एकला चलो रे साठी सिद्ध आहोत अशी भूमिका शिवसेनेने घेण्याचे ठरविले आहे. ५१ जागा तरी हव्याच असा हट्ट भाजपाने धरला आहे. त्याला आधार म्हणून वनगा यांनी खासदारकीच्या गेल्या निवडणुकीत प्राप्त केलेल्या ५,३३,२०१ या मतांचा हवाला दिला जातो आहे. त्याची पोल शिवसेनेने खोलली आहे. वनगा यांना मिळालेली मते ही संपूर्ण पालघर लोकसभा मतदारसंघातून मिळालेली आहे. तसेच नालासोपारा आणि वसई या दोन विधानसभा मतदारसंघात वनगा यांना बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या पेक्षा कमी मते मिळाली आहेत. हे भाजपाने विसरू नये. जाधव यांना २,९३,६८१ मते लोकसभा निवडणुकीत मिळाली होती. यातला मोठा हिस्सा हा वसई आणि नालासोपारा याच भागातला होता. तसेच वनगा यांना मिळालेल्या मतांमध्ये मोदी लाटेचा प्रभाव होता. सध्या मोदी लाट कुठेही नाही. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा आणि वसई या दोनही विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव झाला आहे. म्हणजे मोदी लाट असतांनाही लोकसभा निवडणुकीत भाजपाचे वनगा या दोन विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर होते. तसेच त्या नंतरच्या विधानसभेच्या मोदी लाटेत युतीच्या उमेदवारांचा बविआच्या क्षितीज आणि हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपारा व वसई मतदारसंघात पराभव केला आहे. असे असताना लोकसभेच्या मतांच्या आकडेवारीच्या जोरावर महापालिकेच्या निम्म्या जागा मागणे हा राजकीय पोरकटपणा आहे, असे शिवसेनेने भाजपाला सुनावले आहे. एकीकडे विधानसभा आणि जिल्हा बॅक यातील यशामुळे आक्रमक झालेली बविआ आणि अंबरनाथ-बदलापूर पालिका निवडणुकीत स्वबळावर सत्तेवर आल्याने फुरफुरणारी शिवसेना या दोघांच्या स्पर्धेत स्वत:चे अस्तित्व कसे राखावे असा प्रश्न आता भाजपाला पडला आहे.
(विशेष प्रतिनिधी)

४भाजपाचा खासदार निवडून येऊन व केंद्रात सत्ता प्राप्त करून एक वर्ष झाले. राज्याची सत्ता प्राप्त होऊन सहा महिने झालेत. तरी भाजपाने वसई आणि नालासोपाऱ्यात कोणता उजेड पाडला, कोणते आंदोलन केले, कोणते कार्यक्रम घेतले, यांचे संघटन शहरात कधी दिसले का असेही खोचक प्रश्न शिवसेनेने विचारलेत. काही नवा राजकीय लाभ घडविणे सोडा, ताब्यात असलेली वसई विकास सहकारी बँकही भाजपा आणि संघाच्या तावडीतून सोमवारी लागलेल्या निकालाद्वारे निसटली. अशा स्थितीत भाजपाने या निवडणुकीत ५० जागा मागणे म्हणजे ‘मियाँमूठभर दाढी हात भर’ असा प्रकार ठरेल. असेही सेनेने भाजपाच्या मुखंडांना सुनावल्याचे समजते.

४लोकसभा निवडणुकीतील मते पालघर मतदासंघ - २०१४
चिंतामण वनगा, भाजपा - ५,३३,२०१ सहा वि.स.मधील एकूण मते
बळीराम जाधव, बविआ - २,९३,६८१ वसई, सोपारा येथील मते अधिक

४ विधानसभा निवडणूक वसई मतदारसंघ - २०१४
हितेंद्र ठाकूर, बविआ - ९७,२९१
विवेक पंडित, अपक्ष - ६५,३९५
४ भाजपाचा उमेदवार या मतदारसंघात एकदाही लढला नाही.

Web Title: BJP is ready to form a coalition of 30 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.