भाजपा नोंदणीला थंडा प्रतिसाद!

By admin | Published: January 2, 2015 01:46 AM2015-01-02T01:46:31+5:302015-01-02T01:46:31+5:30

भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भासह मुंबई-कोकणात थंडा प्रतिसाद मिळत असून, याचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत बैठक घेणार आहेत.

BJP registers a cold response! | भाजपा नोंदणीला थंडा प्रतिसाद!

भाजपा नोंदणीला थंडा प्रतिसाद!

Next

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी मोहिमेला विदर्भासह मुंबई-कोकणात थंडा प्रतिसाद मिळत असून, याचा आढावा घेण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शुक्रवारी मुंबईत बैठक घेणार आहेत.
मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १ लाख याप्रमाणे ३६ लाख सदस्य करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र प्रत्यक्षात साडेचार लाख सदस्य नोंदवले गेले. दोन वर्षांनंतर मुंबई पालिकेच्या निवडणुका असल्याने मुंबईतील थंडा प्रतिसाद ही भाजपाकरिता चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्रिपद विदर्भाकडे असून, विदर्भात ८ मंत्री आहेत. उत्तर महाराष्ट्रातील खडसे व गिरीश महाजन हे २ मंत्री असून, त्यांनी सदस्य नोंदणीत विदर्भावर आघाडी घेतली आहे. कोकणातही नोंदणी अभियानाला थंडा प्रतिसाद आहे. (विशेष प्रतिनिधी)

१ कोटीचे उद्दिष्ट : महाराष्ट्रात आॅक्टोबर २०१५ अखेरपर्यंत १ कोटी सदस्य नोंदवण्याचे निश्चित केलेले आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांत २० लाख सदस्य नोंदवले गेले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर मोदीमय वातावरण असताना अधिकाधिक सदस्य नोंदवले जातील ही अपेक्षा होती. त्यामुळे शहा हे सर्व आमदार व जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करणार आहेत.

Web Title: BJP registers a cold response!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.