भाजपा,शिवसेना, मनसेत बिग फाइट

By admin | Published: October 11, 2014 11:09 PM2014-10-11T23:09:55+5:302014-10-11T23:09:55+5:30

शिवसेनेने पहिल्यांदाच भाजपाविरोधात उमेदवारी दिल्याने हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, हे सत्यात उतरवण्यासाठी शिवसैनिकांसह भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.

BJP, Shiv Sena, MNS, Big Fight | भाजपा,शिवसेना, मनसेत बिग फाइट

भाजपा,शिवसेना, मनसेत बिग फाइट

Next
>अनिकेत घमंडी - ठाणो
डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, बसपाचे दयानंद किरतकर, काँग्रेसचे संतोष केणो, राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास म्हात्रे, मनसेचे हरिश्चंद्र पाटील यांच्यासह अन्य आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 
गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी कधीही भाजपाशिवाय आमदार झालेला नाही. असे असतानाच या ठिकाणी महायुतीच्या फुटीनंतर आता शिवसेनेने पहिल्यांदाच भाजपाविरोधात उमेदवारी दिल्याने हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, हे सत्यात उतरवण्यासाठी शिवसैनिकांसह भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील निवडक लढतींमध्ये या लढतीत बिग फाइट असल्याने केंद्रासह राज्यातील पक्षश्रेष्ठींचे लक्ष लागले आहे. मात्र, असे असतानाच भाजपा वगळता अन्य चारही पक्षांनी ‘आगरी’ कार्ड वापरून  उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे येथील आगरी मतदारांचा टक्का विभागला जाणार असून आपल्याच पारडय़ात जास्तीतजास्त आगरी मते कशी पडतील, याची खेचाखेच करण्यात चारही उमेदवारांचा वेळ खर्च होत आहे. साहजिकच, याचा लाभ भाजपा उमेदवाराला होणार असून चव्हाण हे कोकणी असल्याने स्वाभिमानी अशी ख्याती असलेले ते उमेदवार असून त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
जनसंघापासून या ठिकाणी पारंपरिक मते ही निश्चितपणो त्या उमेदवाराच्या पारडय़ात जातात. त्यात आता गेल्या काही वर्षापासून या मतदारसंघात जैन-गुजराती, कोकणी आणि उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य प्रचंड वाढले आहे. ते प्रमाण तुलनेने ब्राrाण आणि आगरी समाजाएवढेच असल्याने त्या मतदारांचा कौल ज्याच्या पारडय़ात जाईल, तो उमेदवार विजयश्री खेचून आणोल, हे स्पष्ट होत आहे. 
2क्क्9 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 2,76,426 मतदार होते. त्यापैकी 1,28,3क्9 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी चव्हाण यांचा 61,1क्4 मते मिळून विजय झाला होता. त्यांनी मनसेच्या राजेश कदम यांचा पराभव केला. त्यांना 48,777 मते मिळाली होती. काँग्रेसने या ठिकाणी उमेदवारच उभा केला नव्हता. त्यामुळे चव्हाणांना एकहाती यश मिळाले. बसपाच्या दयानंद किरतकर यांना 2,3क्7 तर  आरपीआयच्या शंकरलाल पटेल यांना 9,क्64 मते मिळाली होती.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात मनसेच्या  प्रमोद (राजू) पाटील यांना लोकसभेला 26,539 मते मिळाली. ती विधानसभेतील चव्हाण यांना मिळालेल्या एकूण मतांच्या 34 हजार 565 मतांनी कमी आहेत. म्हणजेच महायुतीची त्यातही भाजपाची मते या ठिकाणी शाश्वतच आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या  उमेदवाराला या विधानसभा मतदारसंघात 9क्,359 मते तर पराभूत झालेल्या माजी खासदार आनंद परांजपे यांना अवघी 18,174 मते मिळाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेस या आघाडीच्या उमेदवारांपेक्षा महायुतीच्या उमेदवाराला तब्बल 72,185 एवढी मते अधिक मिळाली.
 
या ठिकाणी आगरी टक्का लक्षणीय असला तरीही त्याची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे या आगरी उमेदवारांमध्ये विभागणी होणार आहे. त्यातच येथील संघ परिवाराची पारंपरिक मते अल्प प्रमाणात या पक्षाच्या उमेदवारांना मिळतील. मात्र, त्या तुलनेत आगरी टककयासह संघ परिवाराची बहुतांशी मते भाजपासह शिवसेनेच्या पारडय़ात पडणार असल्याचे समीकरण मांडण्यात येत आहे. त्यामुळे अन्य सर्व पक्षांनी आगरी कार्ड समोर ठेवून उमेदवार दिले असले तरीही या मतदारसंघातील अन्य मतदारांचे बलाबल विचारात घेणोही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ख:या अर्थाने लढत ही भाजपा-शिवसेना काही प्रमाणात मनसे यांच्यात होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
 
भाजपा उमेदवाराला काही दिवसांपूर्वी पक्षातून विरोध झाला होता, तो हळूहळू मावळत आहे.  मात्र, जनादर आणि लोकाभिमुखतेमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांस पुन्हा संधी दिली आहे. त्यातच महायुती तुटल्याने त्या उमेदवाराने पक्षदृष्टीने कल्याण जिल्ह्यात विरोधकांसाठी तोडीसतोड उमेदवार दिल्याचा विश्वास वरिष्ठांना आला. त्यामुळे जिल्हा नेतृत्व करणा:या त्या नेत्यास पुन्हा संधी देऊन डोंबिवलीकर मतदारांच्या हाती निर्णय सोपवला आहे. त्यासाठी पारंपरिक मतदार, कोकणी आणि गुजराती-जैन, उत्तर प्रदेशीय मतदार यांच्याशी जास्त संपर्कात असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
‘शेठ’ आम्ही भाडोत्री नाही आम्हीही मालक : 
येथील आगरी असलेल्या ‘शेठ’, ‘दादा’ आदींनी ब्राrाण, कोकणी आणि गुजराती, उत्तर प्रदेशीय नागरिकांना नेहमीच ‘भाडोत्री’ असा उल्लेख करून अपमानाची वागणूक दिली आहे. त्यामुळे मतांच्या जोगव्यासाठी कोणी कितीही प्रय} केले असले तरीही ‘आगरी नको रे बाप्पा’ असा चंग शहरवासीयांनी बांधला असल्याचे चित्र आहे. त्यासाठी कोकणवासीयांनी तर भाडोत्री नाही आम्ही मालक आहोत, असा आक्रमक पवित्र घेऊन त्यांच्या ज्ञातीच्या उमेदवाराला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कंबर कसली आहे.
 
गेल्या वेळेस ही विधानसभा काँग्रेसच्या वाटय़ाला होती. मात्र, केवळ मैत्रीखातर या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता़ यंदा तोच कित्ता न गिरवता संतोष केणो यांस उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीनेही स्थायी समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या खांद्याला खांदा लावून तटस्थ भूमिका घेतलेल्या विकास म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. मनसेनेही पूर्वाश्रमीचे भाजपाचे माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संघ परिवारातील मते त्यांना मिळतील, अशी आशा त्यांच्यासह पक्षश्रेष्ठींना आहे. मात्र, त्यांनी निवडलेला पक्ष डोंबिवलीकरांना तितकासा अपील होत नसल्याचे लोकसभेत दिसून आले.
 

Web Title: BJP, Shiv Sena, MNS, Big Fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.