Join us

भाजपाने मनसेला सोबत घेऊ नये; आरपीआय असताना त्यांची गरज काय?- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 3:24 PM

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर टीका करत राज ठाकरेंना डिवचलं आहे.

मुंबई- मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. तसेच मनसेप्रमुखराज ठाकरे महाविकास आघाडीवर जोरादार टीकास्त्र सोडत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपा युतीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मनसेवर टीका करत राज ठाकरेंना डिवचलं आहे.

भाजपाचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपासोबत असल्याचे त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपाला मनसेची गजर काय?, असा सवालही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. तसेच मनसेच्या सभेला गर्दा होत असली, तरी मतं मात्र मिळत नाहीत, असा टोला देखील रामदास आठवले यांनी लगावला. 

मशिदीवरील भोंगे काढण्याची जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याच्याशी रिपब्लिकन पक्ष सहमत नाही. मंदिरावर भोंगे लावायचे असतील आणि हनुमान चालिसा म्हणायचे असेल तर म्हणा, पण मशिदीवरील भोंगे काढण्याचा आग्रह अजिबात चालणार नाही. संविधानाने तो अधिकार दिला असून महाराष्ट्रात लोकशाही आहे, असेही आठवलेंनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार हे जातीयवादी नसून ते धर्मनिरपेक्ष असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितलं. 

दरम्यान, रिपब्लिकन पक्षातील सर्व गट-तट बंद होऊन एकच पक्ष निर्माण होणे आवश्यक असल्याचेही आठवलेंनी म्हटले. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर पुढे आल्यास तेच या पक्षाचे अध्यक्ष असतील. आपण कोणतेही पद घेऊन काम करू, पण प्रकाश आंबेडकर हे ऐकत नाहीत, असा अनुभवच आठवलेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :राज ठाकरेरामदास आठवलेदेवेंद्र फडणवीसभाजपामनसे