Join us

भाजपने दाखवले काळे झेंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मेट्राे चाचणीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर निषेधाचे फलक दाखवून घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मेट्राे चाचणीवेळी भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर निषेधाचे फलक दाखवून घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरेच्या मेट्रो कारशेडला स्थगिती देत कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे तसेच आडमुठ्या धोरणांमुळे प्रकल्पाची किंमत तब्बल आठ हजार कोटींनी वाढली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील या प्रकल्पाचे श्रेय लाटण्यासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी करून चाचणी मार्गिकांचे उद्घाटन करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातला, असा आराेप यावेळी भातखळकर यांनी केला. आरेमध्ये डेपो झाला असता तर आज कुलाबा-सिप्झ मेट्रो धावताना दिसली असती, परंतु ठाकरे सरकारच्या हेकेखोरपणामुळेच अद्याप केवळ चाचण्या सुरू आहेत. कोरोना संकटकाळात मेट्रो उद्घाटनाच्या ठिकाणी लेजर शो, आकुर्ली मेट्रो स्टेशन फुलांच्या माळांनी सजविणे आणि प्रसारमाध्यमांमध्ये कार्यक्रमाच्या जाहिराती देत काेट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा तो पैसा कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जनतेसाठी वापरता आला नसता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

---------------------------------