मुंबई : आगामी महापालिका निवडूकीला सुमारे एक वर्षाचा कालावधी असतांना पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे.गोरेगावचे माजी नगरसेवक समीर देसाई आणि 800 अल्पसंख्याक बांधवानी अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला होता.तर आज माजी शाखाप्रमुख यांनी सपत्नीक व कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला.
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसत मुंबई भाजपाचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यानी कार्यकर्त्याना कामाला लागण्याचे आदेश देत मतदाराची यादी पाहणे या चार वर्षात कोणी किती काम केले कोण पार्टी सोडून कशासाठी गेले त्याना पुन्हा पक्षात कसे आणता येईल यासाठी आतापासून कसून प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गोरेगाव येथे झालेल्या भाजपाच्या जाहिर कार्यक्रमात शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख असलेले सुशील चव्हाण यानी पक्ष प्रवेश केला तर मागिल महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्र 56 मधून निवडणूक लढवणार्या मेधा सुशील चव्हाण यानी देखील कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला.यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यानी कार्यकर्त्याना येणार्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे आदेश देत मतदारांची नावे यादीत नोंद आहे का ? पार्टी सोडून गेलेल्या लोकाना परत कसे आणता येईल कोणी किती कामे केली याची नोंद घ्या असे सांगितले.
या कार्यक्रमात मुंबई महापालिका प्रभारी, आमदार अतुल भातखळकर, आमदार अमित साटम,स्थानिक आमदार विद्या ठाकूर, भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर,संजय उपाध्याय, उत्तर पच्छिमचे जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर,प्रभाग समिती अध्यक्ष हर्ष पटेल, नगरसेवक दिपक ठाकूर, नगरसेवक संदीप पटेल नगरसेविका श्रीकला पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते.