Join us

भाजपा प्रदेश कार्यकारिणी: खडसे, तावडे, मेहतांना पुन्हा डावलले; पंकजा वेटिंगवर, बावनकुळेंचे जमले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 3:11 AM

नव्या चेहऱ्यांना संधी, जुन्यांकडे दुर्लक्ष

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा आणि जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पक्षाला चांगले यश देणाºया काही जिल्ह्यांवर अन्याय झाल्याचे दिसते. माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांची आमंत्रित सदस्य म्हणून बोळवण करण्यात आली. तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रात पाठवणार असल्याचे सांगून वेटिंगवर ठेवले आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

बावनकुळे यांना विधानसभेची संधी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आहे. मात्र असाच अन्याय विनोद तावडे, प्रकाश मेहता यांच्यावर झाला होता. तरीही ते वंचित राहिले. निमंत्रित व विशेष निमंत्रित सदस्य हे मार्गदर्शक मंडळासारखे असतात. पक्षनेतृत्वाच्या विरोधात सातत्याने टीका करणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही तेथेच पाठवून त्यांच्या टीकेची फारशी पर्वा पक्ष करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊ करण्यात आले होते, मात्र त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले व पंकजा यांना केंद्रीय भाजपात संधी देण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले.

पक्षसंघटनेत काम करण्याचा अनुभव असलेले जयकुमार रावळ, डॉ. संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, माधवी नाईक, सुजितसिंह ठाकूर, श्रीकांत भारतीय यांना महत्त्वाची पदे देण्यात आली. उपाध्यक्षपद दिलेले जयप्रकाश ठाकूर हे माजी राज्यमंत्री आमदार विद्या ठाकूर यांचे पती आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणाºया किमान पाच जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळाले नाही.नवे चिटणीसप्रमोद जठार सिंधुदुर्ग, नागनाथ निडवदे लातूर, संजय पुराम गोंदिया, राजेंद्र बकाने वर्धा, धम्मपाल मेश्राम नागपूर, खा. रक्षा खडसे जळगाव, अर्चना डेहनकर नागपूर, संदीप लेले ठाणे,स्नेहलता कोल्हे अहमदनगर, दयानंद चोरघे भिवंडी, इद्रिस मुलतानी औरंगाबाद,अमित गोरखे पिंपरी चिंचवड.सहा नवे जिल्हाध्यक्षभाजपने सहा नव्या जिल्हा/ शहर अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. ते असे - भंडारा - प्रदीप पडोळे, गोंदिया - केशवराव मानकर, चंद्रपूर ग्रामीण - देवराव भोंगळे, चंद्रपूर शहर - डॉ.मंगेश गुलवाडे, मीरा-भाईंदर - हेमंत म्हात्रे,सोलापूर ग्रामीण - श्रीकांत देशमुख

टॅग्स :भाजपाएकनाथ खडसेविनोद तावडेप्रकाश मेहताचंद्रशेखर बावनकुळे