मुंबई- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. काल झालेल्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना 'कलंकीत' या शब्दाचा उच्चार करत टीका केली. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, आज राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Breaking: १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंची सुरुवात म्हणजे मी, माझे वडील, माझा कॅमेरा, माझी पत्नी. ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा यांचा जीवनपट आहे, उद्धव ठाकरेंचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीवनपट बघीतला तर शून्य अस्तित्व असलेले उद्धव ठाकरे आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी जीद्द, मेहनतीच्या जीवावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि उद्धव ठाकरे स्वत:च्या नेतृत्वाला कतृत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदाचा अयशस्वी प्रवास तो राज्याच्या जनतेनी बघितला. देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ मिटावा म्हणून जलयुक्त शिवार योजनेसारखी योजना सुरू केली आणि उद्धव ठाकरे यांनी ही योजना बंद पाडली. ही योजना त्यांनी स्वत:च्या अहंकारासाठी बंद पाडली हा कलंक, कलंकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
लोड शेडिंग कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योजना राबवली. यातही काम करणारा यशस्वी मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, आणि त्यांचे मंत्री त्यांच्या काळात कसे बोलायचे हे माहिती आहेत. देशात सर्वात मोठं मेट्रोचं जाळ उभं केलं. दुदृष्टी असणारे देवेंद्र फडणवीस आणि काम बंद पाडणारे म्हणजे उद्धव ठाकरे, असंही बावनकुळे म्हणाले.