Sudhir Mungantiwar: “पक्षाचं चिन्ह फ्लॉवर, पण आता आम्ही फायर होणार”; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:26 PM2022-03-09T16:26:55+5:302022-03-09T16:29:23+5:30
Sudhir Mungantiwar: लोकशाहीच्या मार्गाने मद्य विकणाऱ्या सरकारला नेस्तनाभूत करुन जनतेला आझाद करायचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली असून, आझाद मैदान ते विधान भवनापर्यंत धडक मोर्चाचे काढण्यात आला. आझाद मैदानातून निघालेला मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला. तत्पूर्वी आझाद मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारवर पुष्पा सिनेमातील डायलॉग ऐकवत जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला.
नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचे आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले आहेत, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय
ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो, तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. १९९३ बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचे चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या रणरणत्या उन्हात सूर्याला साक्ष ठेवून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने दळभद्री सरकारला मद्य विकणाऱ्या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचे आहे. असा संकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
सत्तेत आल्यापासून लोकांचे वाटोळ केले
राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचे आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचे वाटोळ केले आहे. आता आमच्या संघर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा नक्की घेणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना केला.