मुंबई : लोकसभा आणि विधानसभेला अनेक राजकीय गणिते बदलली होती. याचा परिणाम महापालिकांच्या निवडणुकांवर दिसणार का नाही, याविषयी अनेक मतमतांतरे होती. पण ए वॉर्डमध्ये वेगळेच चित्र दिसून आले. गेल्या निवडणुकांत ए वॉर्डमध्ये भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता. पण आता या ठिकाणी भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एक असे एकूण तीन नगरसेवक निवडून आले. २०१२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ए वॉर्डमध्ये एकूण चार प्रभाग होते. त्या वेळी या वॉर्डमध्ये काँग्रेसचे दोन, शिवसेनेचा एक आणि अपक्ष एक नगरसेवक होता. पण आता या वॉर्डमध्ये भाजपाचे दोन आणि शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. काँग्रेसला ए वॉर्डमध्ये वर्चस्व राखता आले नाही. शिवसेनेने एक जागा राखली. २२५ प्रभागात मुख्य लढत ही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये होती. काँग्रेसकडून अंजना चाबूकस्वार तर शिवसेनेतून सुजाता सानप निवडणुकीच्या रिंगणात समोरासमोर होत्या. पण या प्रभागात शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी ५ हजार १३५ मतांनी विजय मिळवला.या निवडणुकांनंतर बदलले. काँग्रेसचा परिसर असतानाही भाजपा पुढे आला. (प्रतिनिधी)
‘भाजपा’ची ए वॉर्डमध्ये सरशी!
By admin | Published: February 25, 2017 3:34 AM