कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र स्वबळासाठी भाजपची होणार दमछाक

By admin | Published: September 22, 2014 11:01 PM2014-09-22T23:01:56+5:302014-09-23T00:12:44+5:30

शिवसेनेची यादी तयार; भाजपची चाचपणी--काँग्रेसकडे उमेदवारांचा सुकाळ--‘दक्षिण’ वगळता राष्ट्रवादीची फौज सज्ज

BJP will be ready for the picture in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र स्वबळासाठी भाजपची होणार दमछाक

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र स्वबळासाठी भाजपची होणार दमछाक

Next

जिल्ह्यातील चित्र स्वबळासाठी भाजपची होणार दमछाक
जिल्ह्यातील चित्र : काँग्रेस, शिवसेनेत इच्छुकांची गर्दी; राष्ट्रवादीचीही तयारी; नेत्यांना वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्लक असतानाही राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे व शिवसेना-भाजप युतीचे चित्र अस्पष्ट आहे. चारही पक्ष स्वबळाचे दावे करत असल्याने इच्छुक उमेदवारांत व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था आहे. जर आघाडी व युती झाली नाही, तर या पक्षांचे जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत स्वबळाचे चित्र काय असेल, संभाव्य उमेदवार कोण असतील, याचा ‘लोकमत’ने आढावा घेतला असता कॉँग्रेस, शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी यादी असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीही स्वबळासाठी सक्षम आहे; पण भाजपला उमेदवारीसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम राबवावी लागेल, असेच चित्र पुढे आले.

शिवसेनेची यादी तयार; भाजपची चाचपणी
कोल्हापूर : शिवसेना-भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये पाहता २५ वर्षांची युती केव्हाही तुटेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी ठेवली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेची दहाही विधानसभा मतदारसंघांची इच्छुकांची यादी तयार आहे, तर भाजपकडे निम्म्या जागांची यादी तयार असून, उर्वरित जागांवरही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तरीही दोन्हीकडील स्थानिक नेत्यांना युती होईल, असा विश्वास वाटत आहे.
आठ दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहाही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती घेऊन यादी निश्चित केली आहे; तर भाजपनेही प्रसंगी स्वबळाची तयारी ठेवली आहे. सद्य:स्थितीला कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी, करवीर, राधानगरी या मतदारसंघांतील इच्छुकांची या२२दी तयार आहे.

कोल्हापूर दक्षिण :
अमल महाडिक, राजलक्ष्मी खानविलकर, प्रा. जयंत पाटील, महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, राजाराम शिपुगडे, बाबा देसाई, प्रताप कोंडेकर, निवास साळोखे, प्रा. बी. जी. मांगले, उद्योजक चंद्रकांत जाधव, माणिक पाटील-चुयेकर, राजू माने.
इचलकरंजी : आमदार सुरेश हाळवणकर
करवीर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष
के. एस. चौगुले
राधानगरी : ‘गोकुळ’चे संचालक
अरुणकुमार डोंगळे
इतर मतदारसंघांत चाचपणी सुरू

शिवसेना

कोल्हापूर उत्तर : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर दक्षिण : जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू माने, नगरसेवक संभाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण
करवीर : आमदार चंद्रदीप नरके
राधानगरी : माजी आमदार बजरंग देसाई, ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, प्रकाश आबिटकर, उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत
कागल : माजी आमदार संजय घाटगे
चंदगड : जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार नरसिंग पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील
शाहूवाडी : माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, भारतआप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर
शिरोळ : जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे
हातकणंगले : आमदार सुजित मिणचेकर
इचलकरंजी : जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, नगरसेवक महादेव गौड, उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख धनाजी मोरे, महेश बोहरा

काँग्रेसकडे उमेदवारांचा सुकाळ
कोल्हापूर : कॉँग्रेस पक्षाला ऐनवेळी उमेदवार शोधण्यासाठी विशेष अशी धावपळ करावी लागणार नाही. जिल्ह्यात कॉँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांचा सुकाळ आहे. विशेष म्हणजे गावपातळीवर काँग्रेसचे नेटवर्क असून, माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासारख्या मातब्बरांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे.
२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची आघाडी झाली होती आणि जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघ हे कॉँग्रेसच्या वाट्याला आले होते, तर उर्वरित तीन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले होते. यंदा कॉँग्रेसकडून आणखी एखादा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. शिरोळ व कोल्हापूर उत्तर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितले आहेत. परंतु, कॉँग्रेसने त्याला ठाम नकार दर्शविला होता. जर आघाडी झाली नाहीच, तर कॉँग्रेसला फक्त कागल, राधानगरी व चंदगड अशा तीन मतदारसंघांतच तयारी करावी लागणार आहे.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असे...
चंदगड : भरमू सुबराव पाटील, विद्याधर गुरबे, संभाजीराव देसाई, अंजनाताई रेडेकर
राधानगरी : बजरंग देसाई,
हिंदुराव चौगुले
कागल : परशुराम तावरे, सुरेश कुऱ्हाडे, श्री. बारदेस्कर
कोल्हापूर दक्षिण : सतेज पाटील
करवीर : पी. एन. पाटील
कोल्हापूर उत्तर : सत्यजित कदम, सुरेश साळोखे, सागर चव्हाण, प्रल्हाद चव्हाण
शाहूवाडी : कर्णसिंह गायकवाड
हातकणंगले : जयवंतराव आवळे
इचलकरंजी : प्रकाश आवाडे
शिरोळ : सा. रे. पाटील, अनिल यादव, दिलीप पाटील

‘दक्षिण’ वगळता राष्ट्रवादीची फौज सज्ज
कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये बिघाडी झाली, तर राष्ट्रवादीचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ वगळता इतर नऊ ठिकाणचे उमेदवार तयार आहेत. गेले चार महिने प्रदेश पातळीवरून त्यांची तयारी करून घेतली असून, या उमेदवारांच्या मुलाखतीही झालेल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील इच्छुकांनी भाजपची वाट धरल्याने येथे पेच निर्माण होऊ शकतो; पण हा अपवाद वगळता सर्वच ठिकाणचे राष्ट्रवादीचे उमेदवार निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत
राष्ट्रवादीने लोकसभेच्या निकालानंतर सावध भूमिका घेत प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी सुरू केली होती. त्यानुसार त्यांनी २८८ जागांच्या मुलाखती घेऊन वेळ पडली तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रताप कोंडेकर, राजू माने यांनी तयारी केली होती; पण आघाडी होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांनी ‘कमळ’ हातात घेण्याची तयारी केली आहे.

अशी आहे तयारी...
कागल : हसन मुश्रीफ
राधानगरी : के. पी. पाटील
चंदगड : संध्यादेवी कुपेकर,
संग्राम कुपेकर
हातकणंगले : अशोक माने,
भास्कर शेटे
शाहूवाडी : बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड
शिरोळ : राजेंद्र पाटील-यड्रावकर, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धैर्यशील माने
इचलकरंजी : अशोक स्वामी,
मदन कारंडे, अशोकराव जांभळे
करवीर : मधुकर जांभळे,
प्रदीप पाटील
कोल्हापूर उत्तर : आर. के. पोवार
कोल्हापूर दक्षिण : अनेक इच्छुक; पण सध्या भाजपच्या छावणीत

Web Title: BJP will be ready for the picture in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.