पोटनिवडणुकीत भाजपा विजयी, संख्याबळ पुन्हा ८३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:24 AM2017-12-15T01:24:18+5:302017-12-15T01:24:26+5:30

भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्र. २१ येथे गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत. या प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता.

BJP wins in by-election, 83 again | पोटनिवडणुकीत भाजपा विजयी, संख्याबळ पुन्हा ८३

पोटनिवडणुकीत भाजपा विजयी, संख्याबळ पुन्हा ८३

googlenewsNext

मुंबई : भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्र. २१ येथे गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत. या प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे एकतर्फी ठरलेल्या लढतीत ७६०७ मताधिक्य मिळवत गिरकर विजयी ठरल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले (मकवाणा) यांचा पराभव केला. या विजयामुळे भाजपाचे महापालिकेतील संख्याबळ पुन्हा ८३ झाले आहे.
पोटनिवडणुकीत २८.७५ टक्के मतदान झाले होते. मतमोजणी गुुरुवारी करण्यात आली. यात प्रतिभा गिरकर यांच्या पारड्यात ९५९१ मते तर काँग्रेसच्या नीलम मधाळे (मकवाणा) यांना १९८४ मते पडली.
प्रभाग क्रमांक ६२ शिवसेनेकडे
अंधेरीतील प्रभाग क्रमांक ६२ मध्ये २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत जिंकलेले अपक्ष उमेदवार चंगेज मुलतानी यांचे जात प्रमाणपत्र बोगस ठरले. त्यामुळे आता दुसºया क्रमांकावरील शिवसेनेच्या राजू पेडणेकर यांना नगरसेवकपदी घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ८५ झाले असून मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांच्या घोषणेनंतर शिवसेनेचे संख्याबळ ९१ होणार आहे.

Web Title: BJP wins in by-election, 83 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई