"पवई तलावातील जलपर्णींवर रासायनिक फवारणी, हे शिवसेनेचं, आदित्य ठाकरेंचं कुठलं पर्यावरण प्रेम?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:46 PM2021-09-18T22:46:41+5:302021-09-18T22:57:39+5:30

BJP Yogesh Sagar Slams Shivsena and Aaditya Thackeray : भाजपाने शिवसेना आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

BJP Yogesh Sagar Slams Shivsena and Aaditya Thackeray Over spraying chemicals in Powai lake | "पवई तलावातील जलपर्णींवर रासायनिक फवारणी, हे शिवसेनेचं, आदित्य ठाकरेंचं कुठलं पर्यावरण प्रेम?"

"पवई तलावातील जलपर्णींवर रासायनिक फवारणी, हे शिवसेनेचं, आदित्य ठाकरेंचं कुठलं पर्यावरण प्रेम?"

Next

मुंबई - पवई तलावात महापालिकेच्या एस वॉर्डने रासायनिक फवारणी केल्याने जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला होता. या फवारणीला पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पालिकेला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता महापालिकेला ही फवारणी थांबवावी लागणार आहे. यावरून भाजपाने शिवसेना (Shivsena) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "पवई तलावातील जलपर्णींवर रासायनिक फवारणी, हे शिवसेनेचं, आदित्य ठाकरेंचं कुठलं पर्यावरण प्रेम?" असं म्हणत निशाणा साधला आहे. या प्रकरणावर भाजपाचे आमदार योगेश सागर (BJP Yogesh Sagar) यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे मुंबई महापालिका आयुक्तांना आलेली 16 तारखेची नोटीस म्हणजे पवई तलावात असलेल्या जलपर्णीवर रासायनिक फवारणी करण्यात आली. जलपर्णीला संपवण्यासाठी हे कोणतं शिवसेनेचं पर्यावरण प्रेम आहे. हे कोणतं आदित्य ठाकरेंचं पर्यावरण प्रेम आहे? त्यात मगरी आहेत. जीव आहेत. मासे आहेत. शेकडो जीव आहेत. पवई तलाव मुंबईची शान आहे. त्या जलपर्णीला काढण्याचे अन्य मार्ग आहेत. आपण कुठून तरी एखादी संस्था आणता, त्यांचा अनुभव पाहात नाही. केवळ आणि केवळ टक्केवारीचे हे धंदे आहेत. तेही पर्यावरणावर. हे योग्य नाही" असं योगेश सागर यांनी म्हटलं आहे.

"महापालिकेच्या आयुक्तांवर, महापौरांवर कारवाई करा"

"महापालिकेच्या आयुक्तांवर कारवाई केली पाहिजे. महापौरांवर कारवाई केली पाहिजे. कुठल्या पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास करायला निघाले आहेत. तलाव वाचवायचे राहिले बाजूला असलेल्या तलावावर तुम्ही केमिकलची फवारणी करत आहात. तेही बिन अनुभवी संस्थेकडून? कोणते बगलबच्चे सांभाळायचे आहेत तुम्हाला? असं जर पुन्हा मुंबईत करणार असाल तर मुंबईची जनता सहन करणार नाही. हे आदित्य ठाकरेंनी समजून घ्यावं" असा इशारा देखील योगेश सागर यांनी दिला आहे. 
 

Web Title: BJP Yogesh Sagar Slams Shivsena and Aaditya Thackeray Over spraying chemicals in Powai lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.