मुंबई : मनसेतील सहा नगरसेवकांचे बळ मिळाल्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता सुरक्षित झाली. तसेच एल आणि एन या दोन प्रभाग समित्यांचे अध्यक्षपदही शिवसेनेकडे चालून आले आहे. मात्र, पालिका निवडणूक स्वतंत्र लढविणाऱ्या शिवसेना-भाजपाने प्रभाग समित्यांमध्ये अंडरस्टँडिंग कायम ठेवले आहे. त्यामुळे प्रभाग समित्यांमध्ये हा सामना बरोबरीत सुटणार आहे.मुंबई महापालिकेत १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका १२ व १३ एप्रिल रोजी होणार आहेत. सोमवारी या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेना आणि भाजपा हे दोनच मोठे पक्ष महापालिकेत असल्याने विरोधक सर्वच समित्यांच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपात सरळ लढत होणार होती.महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवून पूर्वीपेक्षा अडीचपट अधिक संख्याबळ भाजपाने मिळवले. मात्र, सत्तेचे गणित चुकल्यामुळे महापालिकेत भाजपाने पहारेकºयांची भूमिका स्वीकारली आहे. परंतु वैधानिक व विशेष समित्यांपासून दूर राहणाºया भाजपा नगरसेवकांनी प्रभाग समित्यांचा मोह सोडलेला नाही. भाजपाचे संख्याबळही अधिक असल्याने शिवसेनेलाही या जागा भाजपासाठी सोडाव्या लागत आहेत.>शिवसेनेला दोन प्रभागांची लॉटरीसध्या १७पैकी ८ प्रभाग समित्या भाजपाकडे, १ प्रभाग समिती भाजपा पुरस्कृत अखिल भारतीय सेनेकडे, तर शिवसेनेकडे ६ प्रभाग समित्या असून १ प्रभाग समिती शिवसेनेच्या पाठिंब्यावर मनसेकडे होती.सहा महिन्यांपूर्वी मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी शिवसेनेत प्रवेश करून सुधार समितीचे अध्यक्षपद मिळविले. त्यामुळे ते अध्यक्ष असलेली एल प्रभाग समिती शिवसेनेकडे येणार आहे.तर मनसेतून घाटकोपर येथील २ नगरसेवक शिवसेनेत आल्याने एन प्रभाग समितीही शिवसेनेकडेच येण्याची शक्यता आहे.>आयारामांना अध्यक्षपदाची लॉटरीमनसेतून शिवसेनेत प्रवेश करणाºया नगरसेवकांपैकी दिलीप लांडे यांना सुधार समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर, आता अर्चना भालेराव यांनाही सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे.निवडणूक प्रभाग समित्यातारीख१२ एप्रिल ए बी आणि ई, सी आणि डी, एफ उत्तर आणि एफ दक्षिण, जी दक्षिण, आर मध्य व आर उत्तर, आर दक्षिण, पी उत्तर, पी दक्षिण -१३ एप्रिल जी उत्तर, एच पूर्व व एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, एम पश्चिम, एल, एन, एस आणि टी१९ एप्रिल एम (पूर्व )विशेष समिती अध्यक्षपदासाठीनावे जाहीरसार्वजनिक आरोग्य समितीसाठी डॉ. अर्चना भालेराव, महिला बालकल्याण समितीसाठी गीता गावकर स्थापत्य समिती (शहर)साठी अरुंधती दुधवडकर तर स्थापत्य समिती (उपनगरे) साधना माने यांना संधी देण्यात आली आहे. विधी समिती साठी संतोष खरात, बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदासाठी हाजी अली खान यांना संधी दिली आहे.>प्रभाग समिती अध्यक्षपदाचे उमेदवारक्र. प्रभाग पक्ष उमेदवार१ ए बी इ - भाजपा गीता गवळी२ सी डी - भाजपा अतुल शहा३ एफ [ द ] व एफ [ उ ] शिवसेना सचिन पडवळ४ जी [ द ] शिवसेना किशोरी पेडणेकर५ जी [ उ ] शिवसेना मारिअम्मल मुत्तू तेवर६ एच पूर्व व एच पश्चिम शिवसेना सदा परब७ के पूर्व भाजपा सुनील यादव८ के पश्चिम भाजपा योगीराज दाभाडकर९ पी दक्षिण भाजपा संदीप पटेल१० पी उत्तर भाजपा जया तिवाना११ आर दक्षिण भाजपा शिवकुमार झा१२ आर मध्य व आर उत्तर शिवसेना रिद्धी खुरसंगे१३ एम पूर्व शिवसेना निधी शिंदे१४ एम पश्चिम भाजपा राजेश फुलवारीया१५ एस आणि टी भाजपा सारिका पवार१६ एल शिवसेना किरण लांडगे१७ एन शिवसेना रूपाली आवळे
भाजपाची सेनेला ‘टाळी’, अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून विरोधक बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 2:16 AM