Join us

भाजपचा आर दक्षिण प्रभाग कार्यालयावर ‘विश्वासघात मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:05 AM

मुंबई : मागील वर्षभराच्या काळात चारवेळा झालेली अतिवृष्टी, दोनवेळा आलेले चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना राज्य सरकार किंवा ...

मुंबई : मागील वर्षभराच्या काळात चारवेळा झालेली अतिवृष्टी, दोनवेळा आलेले चक्रीवादळ यामुळे नुकसान झालेल्या सामान्य मुंबईकरांना राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेने कोणतीही मदत न केल्याबद्दल तसेच विविध मागण्यांची पूर्तता केली नाही, याचा जाब विचारण्यासाठी गुरूवारी मुंबई भाजप प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भारतीय जनता पक्षाच्यावतीने आर/दक्षिण प्रभाग कार्यालयावर ‘विश्वासघात मोर्चा’ काढण्यात आला.

मुंबईतील नागरिक आर्थिक अडचणीत असतानासुध्दा राज्य सरकारने किंवा ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी व १,६०० कोटी रुपये व्याजापोटी उत्पन्न असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कोणतीही मदत दिली नाही. जोपर्यंत सामान्य मुंबईकरांना मदत मिळणार नाही व मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही. आगामी काळात या संदर्भात आणखी मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारासुध्दा आमदार भातखळकर यांनी दिला. यावेळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.