शिवसेनेच्या कोंडीसाठी शहापुरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन

By admin | Published: September 13, 2014 12:07 AM2014-09-13T00:07:10+5:302014-09-13T00:07:10+5:30

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहापुरात शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपाने परिवर्तन संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले

BJP's demonstration of power in Shahapur for the Shiv Sena's dilemma | शिवसेनेच्या कोंडीसाठी शहापुरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन

शिवसेनेच्या कोंडीसाठी शहापुरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन

Next

शहापूर : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहापुरात शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपाने परिवर्तन संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले. भिवंडी लोकसभा मतदार संघाची जागा मिळविल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोष संचारला आहे. हा जोष परिवर्तन मेळाव्यात गर्दीच्या रु पाने पहायला मिळाला. खासदार कपिल पाटील व माजीमंत्री जगन्नाथ पाटील हे या मेळाव्यासाठी खास उपस्थित होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणा-या भिवंडी पूर्व, शहापूर व मुरबाड विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढावे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.
दुसरीकडे शहापूर विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोडावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे. येथील शिवसेनेचे आमदार दौलत दरोडा यांच्या बाबत भाजपात नाराजी आहे. निवडणूक प्रचारात विकासाचा मुद्दा प्रभावी ठरेल असे येथिल चित्र असल्याने गेल्या पाच वर्षात विकास आणि मतदारांच्या संपर्कात कुचकामी ठरलेले आमदार दौलत दरोडा कुठल्या तोंडाने मतदारांच्या समोर जातील, असा सवाल मित्रपक्ष भाजपाने उपस्थित केला असून त्या तुलनेत भाजपचे जि.प.सदस्य काळूराम धनगर, अशोक इरनक व तालूका पं.स. उपसभापती सुभाष हरड यांची कामिगरी सरस ठरली असल्याचा दावाही भाजपा करीत आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघा बाबत भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाच वर्षात विकासात तालुक्याला पिछाडीवर नेणा-या शिवसेनेला बाजूला करुन ही जागा भाजपाला द्यावी असे सरळ मत येथिल भाजपा नेत्यांचे आहे.
त्यासाठी प्रसंगी बंडखोरी करण्याची तयारीही दाखिवली आहे. १९९५ पासून शिवसेना - भाजपा युतीने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला सोडली आहे. २००४ चा अपवाद वगळता सलग तीनवेळा सेनेचे दौलत दरोडा येथे विजयी झाले आहेत. मात्र यावेळी मित्रपक्ष भाजपानेच या मतदारसंघाची मागणी केल्याने विद्यमान सेना आमदार दौलत दरोडांच्या पुढे मोठ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
एकीकडे सेनेची या मतदारसंघातली ताकत वाढत असतांना दुसरीकडे मित्रपक्ष भाजपाने अपशकुन केल्याने गेल्या काही दिवसात अलबेल असलेल्या महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. आजच्या भाजपाच्या शक्तीप्रदर्शनाने शहापूर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. शहापुरात शिवसेना - भाजपात गुंता निर्माण झाल्याने जागावाटपा बाबत शनिवारी दि.१३ होणा-या भाजपाच्या प्रदेश निवड समितीच्या बैठकीकडे शहापूरकरांचे डोळे लागले आहेत. (वार्ताहर)

Web Title: BJP's demonstration of power in Shahapur for the Shiv Sena's dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.