Join us

मुंबई पालिकेवर भाजपाचा डोळा

By admin | Published: November 11, 2014 2:03 AM

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, आता या महापालिकेतील सत्तेवर भाजपाचा डोळा आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून, आता या महापालिकेतील सत्तेवर भाजपाचा डोळा आहे. शिवसेनेची सहनशीलता म्हणजे लाचारी नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. शिवसेनेच्या पदाधिका:यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात आयोजित केला होता. त्यामध्ये ठाकरे बोलत होते. 
ठाकरे म्हणाले की, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रणब मुखर्जी यांना पाठिंबा दिला कारण रालोआने संगमा हा आयात उमेदवार दिला होता. लोकसभा निवडणुकीत देश हाफ चड्डीवाल्यांच्या हातात देणार का, असा सवाल करणा:या, भगवा दहशतवाद म्हणून भाजपावर टीका करणा:या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार का, या आमच्या प्रश्नाचे उत्तर भाजपाने दिलेले नाही. 
इशरत जहाँ ही निरपराध होती की दहशतवादी, ते देशाला कळले पाहिजे. कारण राष्ट्रवादीतील पवार यांचे बगलबच्चे लाखभर रुपयांची मदत घेऊन तिच्याकडे गेले होते, असेही ठाकरे म्हणाले.
केंद्रातील भाजपाचे तेरा दिवसांचे सरकार शरद पवार यांनी पाडले होते.  आता तेच पवार स्थिर सरकारकरिता भाजपाला पाठिंबा देत आहेत, हा 
मोठा विनोद आहे, असे ठाकरे 
बोलले.  शिवसेनेबरोबरची चर्चा 
सुरू असल्याचे भाजपाचे नेते सांगत आहेत. चर्चा चालू द्या, मात्र आता कुणाचा कुणावर विश्वास राहिलेला 
नाही. 
शिवसेनेला चर्चेत गुंतवून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देऊन टाकले जाऊ शकते. त्यामुळे 
विरोधी पक्षनेते पदावर दावा 
केल्याचे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणारच.  
(प्रतिनिधी)