मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:17 PM2022-09-06T17:17:43+5:302022-09-06T17:18:11+5:30

तसेच कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळीस ती निवडणूक जिंकता येते असं फडणवीसांनी म्हटलं.

BJP's Leader and Deputy CM Devendra Fadnavis reaction to MNS-Shinde group alliance over BMC election | मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

मनसे-शिंदे गट युतीवर भाजपाची प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

Next

मुंबई - राज्यातील आगामी राजकीय समीकरणाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश दर्शनासाठी जाणार आहे. तत्पूर्वी मनसे-शिंदे गट युतीच्या बातम्या अनेक माध्यमांमध्ये झळकू लागल्या आहेत. मनसे-शिंदे गटाकडून युतीबाबत कुठलीही अधिकृत भूमिका मांडण्यात आली नाही. परंतु दोन्ही बाजूने थेट नकारही कुणी दिला नाही. आता या चर्चेवर भाजपाकडून प्रतिक्रिया आली आहे. 

पत्रकारांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमची पतंगबाजी मी पाहतो तेव्हा मलाही खूप मज्जा येते. ज्याला जे मनात येईल ते दाखवतो. ज्याला जे विश्लेषण करायचं तो ते करतो. भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना जी एकनाथ शिंदेंसोबत आहे आम्ही एकत्रित निवडणूक लढवू आणि आम्ही मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच कुठलीही निवडणूक लढत असताना आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे असं समजून तुम्ही झोकून देता त्यावेळीस ती निवडणूक जिंकता येते. हे केवळ मुंबई महापालिकेपुरतं नव्हतं तर ते एकूणच निवडणुकीच्या रणनीतीबद्दल होते. भाजपा मिशन भारत आहे, महाराष्ट्रा भाजपाचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

आमचे दैवत एकच, मनसे युतीवर शिंदे गटानं सांगितले... 
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना अभिप्रेत असणारी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे भाकीत बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. हे जर सत्यात उतरत असेल तर वाईट वाटण्याचं कारण नाही. परंतु यावर आत्ताचं सांगणं कठीण होईल. मन जुळत असतील. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत असतील ते हे नैसर्गिक आहे असं सांगत शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी मनसे-शिंदे गट युतीचे संकेत दिले आहेत. 

किरण पावसकर म्हणाले की, मुंबई महापालिकेत कुणाशी कशी युती होईल याबाबत अजून कसलाही निर्णय झाला नाही. राज ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेतून त्यावेळी नेते बाहेर पडले होते. ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. माझा राग विठ्ठलावर नाही, आजूबाजूच्या बडव्यांवर आहे असं राज ठाकरेंनी पहिल्याच भाषणात म्हटलं होते. राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत. आमचं दैवत एकच आहे असं त्यांनी सांगितले. 

Web Title: BJP's Leader and Deputy CM Devendra Fadnavis reaction to MNS-Shinde group alliance over BMC election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.