Join us

गणेश मंडपांच्या मुद्द्यावर भाजपाचे मनसेला साह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 5:22 AM

गणेशोत्सव २४ दिवसांवर येऊनही न्यायालयाच्या निर्बंधामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळालेली नाही.

मुंबई : गणेशोत्सव २४ दिवसांवर येऊनही न्यायालयाच्या निर्बंधामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी मिळालेली नाही. त्या निषेधार्थ पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सव मंडळे येत्या आठवड्यात मुंबईत ठिकठिकाणी महाआरत्या करणार आहेत. तोवर मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात हा विषय नेला आणि कायदेशीर अडचण न येता उत्सव उत्साहात साजरे करण्यासाठी साह्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मनसेने जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेण्यापूर्वीच भाजपा आणि मनसेने या मुद्द्यातील हवा काढून घेतल्याचे चित्र आहे.८ आॅगस्टला बिर्ला भवन येथे झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या सभेला ४०५ मंडळे उपस्थित होती. मंडप उभारण्यास परवानगी देताना जर पालिका प्रशासन आडमुठी भूमिका घेत असेल, तर सरळ महाआरत्या सुरू करा आणि गेली अनेक वर्षे सुरू असलेला गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करा असे, आदेश उद्धव ठाकरे यांनी त्या वेळी दिले होते. अजूनही परवानगी मिळत नसल्याने शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी येत्या आठवड्यात महाआरत्या करण्याचा आणि तिचे लोण पसरण्याचा इशारा दिला आहे.शहाजी राजे मार्गावरील विलेपार्ले सम्राट गणेशोत्सव मंडळाने मंडपासाठी पालिका प्रशासन व वाहतूक विभागाकडे अर्ज करून अनेक दिवस झाले, पण परवानगी मिळालेली नाही. अशी परवानगी न मिळालेल्या इतर मंडळांना सोबत घेत आमदार अनिल परब ठाकरेयांची भेट घेणार असून, त्यांनी आदेशदेताच महाआरत्या सुरू केल्या जातीलआणि तिचे लोण संपूर्ण मुंबईत पसरेल, असा इशारा मंडळाचे अध्यक्ष (पान ८ वर)

टॅग्स :गणपती उत्सवमनसेशिवसेनाभाजपा