Join us

फराज मलिकांच्या अडचणी वाढणार! 'या' प्रकरणावरुन कंबोज यांनी नवाब मलिक यांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:39 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता फराज मलिक यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. भाजपचे मोहीत कंबोज भारतीय यांनी या संदर्भात एक ट्विट करुन इशारा दिला आहे. 

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता फराज मलिक यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. भाजपचे मोहीत कंबोज भारतीय यांनी या संदर्भात एक ट्विट करुन इशारा दिला आहे. 

फराज मलिक यांच्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्र वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांकडून नवाब मलिकांच्या मुलासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाजपचे मोहित कंबोज यांनी ट्विट करुन नवाब मलिक यांना डिवचलं आहे. 'मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे, व्हिसा अर्जासाठी बनवलेल्या बनावट कागदपत्रांसाठी दुसरी पत्नी हॅमलीन जी फ्रेंच रहिवासी आहे! दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोपी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. त्यांना दिवसांपूर्वीच विशेष पीएमएलए न्यायालयाने जामीन  फेटाळला. मलिक यांच्या कुुटुंबाच्या मालकीच्या फर्मद्वारे त्यांच्याकडे वादग्रस्त जमिनीचा ताबा असल्याचे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

निवडणुकीसाठी ४०० दिवसच, अतिआत्मविश्वासात राहू नका! -पंतप्रधान मोदी

दाऊदची बहीण हसीना पारकर आणि तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मलिक यांनी कुर्ला येथील मोक्याची जागा किरकोळ भावात हडपल्याचा आरोप ईडीने केला आहे. मात्र, मलिक यांनी ईडीचा आरोप फेटाळला आहे. मलिक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे संबंधित जागेचा ताबा घेतला आहे. परंतु, ईडीने पॉवर ऑफ ॲटर्नी बनावट असल्याचा दावा केला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांचा जामीन नाकारण्याबाबत ४३ पानी निकालपत्रात पाच कारणे दिली आहेत.

टॅग्स :नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामोहित कंबोज भारतीय