सरकारी कामात भाजपाचा अडथळा नगरसेवक, आमदाराच्या पीएकडून अरेरावी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:06 AM2018-02-28T02:06:49+5:302018-02-28T02:06:49+5:30

भाजपाकडून सार्वजनिक आरोग्यखात्याच्या कामात अडथळा आणल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी बोरीवलीत उघडकीस आला आहे.

 BJP's obstacle in government work, corporator, MP from BJP? | सरकारी कामात भाजपाचा अडथळा नगरसेवक, आमदाराच्या पीएकडून अरेरावी?

सरकारी कामात भाजपाचा अडथळा नगरसेवक, आमदाराच्या पीएकडून अरेरावी?

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर 
मुंबई : भाजपाकडून सार्वजनिक आरोग्यखात्याच्या कामात अडथळा आणल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी बोरीवलीत उघडकीस आला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणा-या जनावरांना पकडून नेणा-या ‘सार्वजनिक आरोग्य खात्या’च्या गुरांचा कोंडवाडा (कॅटल पाउंड आॅफिस), या विभागाच्या गाडीतून बळजबरी ३ गायी खेचून बाहेर काढण्यात आल्या. या विभागातील कर्मचाºयांसोबत स्थानिक भाजपा आमदाराचा खासगी सचिव, तसेच नगरसेवकाने अरेरावी करत, सरकारी कामात अडथळा आणला. मात्र, या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी निव्वळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बोरीवलीच्या रॉयल कॉम्प्लेक्समध्ये जैन मंदिराजवळ गायी बांधण्यात आल्या असून, त्यावर कारवाई करण्याची तक्रार एमएचबी पोलिसांकडून सार्वजनिक आरोग्य खात्याच्या गुरांचा कोंडवाडा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी कांदिवलीत १ आणि नंतर जैन मंदिराकडून २ गायी गाडीत भरल्या. स्थानिकांनी ही बाब पहिली आणि आरडाओरड सुरू केली. त्याच दरम्यान स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांचे खासगी सचिव शशिकांत कदम त्या ठिकाणी आले आणि त्यांनीदेखील सरकारी कर्मचाºयांना ‘तुम्ही या गायी नेऊ शकत नाही,’ असे दरडावले. तेव्हा कोंडवाड्यामध्ये आलेली जनावरे मालकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सोडवावी, अशी विनंती सरकारी कर्मचाºयांनी कदम यांना केली. तेव्हा दंड आम्ही इथेच भरतो, असे कदम त्यांना म्हणाले. या प्रकरणी गुरांचा कोंडवाडा विभागाचे अधिकारी दिलीप करंजकर यांना त्यांच्या कर्मचाºयांनी फोन केला. मात्र, जनावरे सोडू शकत नाही, असे उत्तर त्यांनीही दिले.
त्यानंतर, कदम निघून गेले आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक जितेंद्र पटेल त्या ठिकाणी आले. त्यांनीदेखील या परिसरातून गायी तुम्ही नेताच कसे, आम्ही जनावरे न्यायला देणारच नाही, असे म्हणत, ते चक्क ‘कॅटल व्हॅन’च्या समोरच रस्त्यावर बसले, तसेच कर्मचाºयांशी वादही घातला. त्यामुळे त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनीही कर्मचाºयांबाबत अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. या कर्मचाºयांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तेव्हा बोरीवली पोलीस ठाण्यातून १ अंमलदार तेथे पोहोचले. त्यांच्यासमोर काही तरुण ‘कॅटल व्हॅन’मध्ये चढले आणि त्यांनी गाडीचा फाळका बळजबरी उघडून, त्यातून गायींना खाली उतरविले. मुख्य म्हणजे, या प्रकरणी बोरीवली पोलीस तक्रार घेण्यास कुरकुर करत होते. अनेकदा विंनती केल्यावर त्यांनी अज्ञातांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला.
‘लोकमत’च्या हाती लागला व्हिडीओ
सरकारी गाडीवर चढून बळजबरीने त्यातील गायींना बाहेर काढण्यात आले, याचा व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. त्यानुसार, पोलीस आता यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दखलपात्र गुन्ह्याची नोंद का नाही?
बोरीवलीत घडलेल्या या प्रकाराविरोधात, तसेच सरकारी कामात अडथळा करत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करायला हवा होता. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठीशी घातले, असे गुरांचा कोंडवाडा विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद न केल्याने, त्यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
‘ते’ लोकांना समजावत होते
कदम आणि पटेल हे लोकांची समजूत काढत होते. पालिकेच्या कामात अडथळा करू नका, असे सांगत होते. त्यानंतर, ते प्रभाग समितीच्या बैठकीसाठी निघून गेले.
- मनिषा चौधरी, स्थानिक आमदार.

Web Title:  BJP's obstacle in government work, corporator, MP from BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.