मुंबई : सरकारला सहा महिने होत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी एकही निर्णय घेतलेला नाही. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना काम करू देत नसावेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.नवाब म्हणाले, २१ आॅक्टोबर ते २० मे या कालावधीत राज्य मंत्रिमंडळाच्या २१ बैठका झाल्या. त्यात एकूण ६५ निर्णय घेण्यात आले. १८ कॅबिनेट मंत्र्यापैकी ६ मंत्र्यांनी आपल्या विभागाशी संबंधित एकही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणला नाही. त्यामध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, विष्णू सावरा यांचा समावेश आहे. याचाच अर्थ हे मंत्री निष्क्रीय आहेत, असेही मलिक म्हणाले. फॅक्टरी अॅक्टची व्याख्या बदलल्यामुळे लाखो कामगारांचे नुकसान होणार आहे. याआधी त्यांना कामाच्या ठिकाणची सुरक्षा, वैद्यकीय सुविधा मिळत होत्या. दुर्घटना झाल्यास नुकसानभरपाई मिळत होती. ती या नव्या कायद्याच्या बदलामुळे लघुउद्योगात कामगारांना मिळणार नाही, असा दावा मलिक यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
सेनेच्या मंत्र्यांवर भाजपाचा दबाव
By admin | Published: May 22, 2015 1:21 AM