Raju Shetty : "महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 05:57 PM2022-06-26T17:57:44+5:302022-06-26T17:58:25+5:30

सांगलीत शनिवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, शेतकरीविरोधी धोरणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडली आहे.

BJP's role in destabilizing the state government is inappropriate, Raju shetty on politics | Raju Shetty : "महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य"

Raju Shetty : "महाराष्ट्राची बदनामी थांबवा, राज्य सरकार अस्थिर करण्याची भाजपची भूमिका अयोग्य"

Next

सांगली : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करून देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे, हे अयोग्य आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खा. राजू शेट्टी यांनी भाजपबाबत व्यक्त केले.

सांगलीत शनिवारी पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले की, शेतकरीविरोधी धोरणामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून यापूर्वीच बाहेर पडली आहे. शेतकऱ्यांविरोधात केंद्र व राज्य सरकारचे एकमत आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. एफआरपीचे तुकडे, कर्जमाफीवरून आम्ही बाहेर आहोत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी सत्तेत राहिली आणि नाही राहिली तरी आनंद, दु:ख होणार नाही. एक आहे की, केंद्रातील भाजप सरकारने कर्नाटक, आंध्र प्रदेशसह काही राज्यांतील सरकारे पाडली. हे आम्हाला चुकीचे वाटते.

सांगलीत शेट्टी-संजयकाकांची बंद खोलीत चर्चा
भाजपचे खासदार संजयकाका पाटील व माजी खा. राजू शेट्टी यांची शासकीय विश्रामगृहावर भेट झाली. त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यानंतर वीस मिनिटे बंद खोलीत चर्चा केली.
 

Web Title: BJP's role in destabilizing the state government is inappropriate, Raju shetty on politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.