Join us  

सरपंचपदी भाजपाचे सचिन पाटील

By admin | Published: June 18, 2014 3:03 AM

भिवंडी तालुक्यातील श्रीमंत तसेच गोडावून पट्टा म्हणून विकसित होत असलेल्या कुरुंद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याकरिता भाजपा व मनसेचे सदस्य एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली आहे

पडघा : भिवंडी तालुक्यातील श्रीमंत तसेच गोडावून पट्टा म्हणून विकसित होत असलेल्या कुरुंद ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सत्तेपासून रोखण्याकरिता भाजपा व मनसेचे सदस्य एकत्र येऊन सत्ता हस्तगत केली आहे. सत्तेकरिता भाजपा - मनसे असा एक वेगळाच पॅटर्न उभा राहिल्याने आश्चर्च व्यक्त होत आहे.शिवसेनेच्या ताब्यामध्ये असलेल्या कुरुंद ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश ठाकरे यांनी सरपंचपदाचा पुढील कार्यकाळ सेनेच्या साईनाथ पाटील यांना मिळावा, याकरिता राजीनामा दिल्याने रिक्त जागेकरिता निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून सरपंचपद आपल्याकडे राहावे याकरिता मनसेच्या सदस्यांना आपल्या बाजूने वळवले. अकरा सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरिता शिवसेनेचे साईनाथ पाटील व मनसेच्या पाठिंब्यावर भाजपाचे सचिन पाटील यांच्यामध्ये सरळ लढत होती. यामध्ये मनसे-भाजपा पॅटर्नचे भाजपाचे सचिन पाटील यांनी सेनेच्या साईनाथ पाटील यांचा आठ विरुद्ध तीन मतांनी पराभव करून ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाले. (वार्ताहर)