मुंबई : महापालिकेची आर्थिक नाडी असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे राखून मित्रपक्षाची बेस्ट समितीवर बोळवण करणाऱ्या शिवसेनेला भाजपाने दणका दिला आहे़ बेस्ट समितीवर भाजपाचा अध्यक्ष निवडून येताच फिडर रुटचे (कमी अंतराची बससेवा) भाडे कमी करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़पुढच्या वर्षीची पालिका निवडणूक उभय पक्ष स्वतंत्र लढविण्याचे संकेत असल्याने श्रेय लाटण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये जोरदार चढाओढ सुरु आहे़ बेस्ट उपक्रमाचा थेट मुंबईकरांशी संपर्क येत असल्याने निवडणुकीच्या आदल्या वर्षी मिळालेल्या या संधीचे सोने करण्याची तयारी भाजपाने सुरु केली आहे़ शिवसेनेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दोन वर्षांत तीनवेळा भाडेवाढ झाली़ तर अध्यक्षपद मिळताच भाजपाने बसभाडे कमी करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे़ कमी अंतराच्या भाड्यात सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव तयार होत आहे़ मात्र केवळ भाडे कमी करुन भागणार नसल्याने बस वेळेवर स्टॉपवर पोहोचेल, याची खबरदारीही घेण्यात येईल, असे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)असे काही बदलनफ्यात असलेल्या बसमार्गांवरील बसगाड्या वाढविणे़ तर तोट्यात चालणाऱ्या बसमार्गांच्या बस सेवेमध्ये कपात करण्यात येणार आहे़ बसगाड्या वाहतूक कोंडीत अडकत असल्याने स्टॉपवर वेळेत पोहोचत नाही़ परिणामी प्रवासीवर्ग शेअर रिक्षाचा पर्याय अवलंबितात़ त्यामुळे वेळेला महत्त्व देऊन बस आॅनटाईम पोहोचेल, याची खबरदारी घेण्यात येणार आहे़रिक्षा इच्छितस्थळी लगेच पोहोचवत असते़ तर बस अनेक स्टॉप घेत जाते़ त्यामुळेही प्रवासी घटले आहेत़ त्यामुळे नॉन स्टॉप बस सेवेचाही विचार सुरु आहे़ कमी अंतराच्या बसमार्गांवरच हा प्रयोग होईल़घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत जाणाऱ्या प्रवासी वर्गाची संख्या ६० टक्क्यांहून अधिक आहे़ अशा छोट्या अंतराचे प्रवासी भाडे सहा ते आठ रुपये आहे़
भाजपाचा शिवसेनेला दणका
By admin | Published: April 19, 2016 2:45 AM