Join us

राज्य सहकारी संघावर भाजपाचे वर्चस्व, पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 7:06 AM

राज्य सहकारी संघाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने वर्चस्व मिळवल्यानंतर संघाच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ पथाडे, तर मानद सचिवपदी विद्या पाटील यांची निवड झाली आहे.

मुंबई - राज्य सहकारी संघाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील गटाने वर्चस्व मिळवल्यानंतर संघाच्या अध्यक्षपदी प्रताप पाटील, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ पथाडे, तर मानद सचिवपदी विद्या पाटील यांची निवड झाली आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेटघेतली.राज्यातील सहकार चळवळीचे लक्ष लागलेल्या राज्य सहकारी संघाच्या या निवडणुकीत अखेरपर्यंत समन्वय न झाल्याने आमदार दरेकर आणि काँग्रेस नेते संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये चुरशीची निवडणूक झाली. त्यामध्ये २१ पैकी १२ संचालकांनी दरेकर यांच्या गटातील उमेदवारांना मतदान केले. त्यामध्ये डॉ. प्रताप पाटील, सिद्धार्थ पथाडे, विद्या पाटील, सुहास तिडके, गुलाब मगर, सुभाष आकरे, भिकाजी पारले, भाऊसाहेब कुºहाडे, विलास महाजन, पांडुरंगकाका सोलेपाटील, रामकृष्ण बांगर, निगोंडा हुल्याळकर यांचा समावेश आहे.आमदार दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना राज्य सहकारी संघाच्या संचालकांना भेटवून राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.तसेच कर्मचाºयांचा रखडलेला पगार देण्यासंदर्भात विनंती केली होती. तसेच मजूर सहकारी संस्थांचे शासन दरबारी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठीही विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रश्नांमध्ये लक्ष घालून, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या समन्वयातून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा या निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होऊन राज्य सहकारी संघावर दरेकर यांच्या गटातील उमेदवारांना १२ मते, तर संजीव कुसाळकर यांच्या गटातील उमेदवारांना ९ मते मिळाली आहेत.मुख्यमंत्र्यांचे आरपीआयला झुकते माप!निवडून आलेल्या २१ पैकी ११ सदस्यांचे बहुमत असतानाही, बारावे संचालक रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ पथाडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यास मुख्यमंत्र्यांनी झुकते माप दिले. त्यामुळे संघीय शिखर संस्थेत संधी देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्याचे सहकार दालन दलित समाजासाठी खुले केले आहे.

टॅग्स :मुंबईभाजपा