बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 05:36 PM2019-11-10T17:36:23+5:302019-11-10T18:15:42+5:30
बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल अखेर आजपासून (10 नोव्हेंबर) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मुंबई: बीकेसी- चुनाभट्टी उड्डाणपूल अखेर आजपासून (10 नोव्हेंबर) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यासंबंधीत अधिकृत घोषणा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेहून आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेकडे जाणार्या मार्गावरून सुद्धा गतिमान कनेक्टिव्हीटी प्राप्त होणार आहे. हा उन्नत मार्ग बीकेसी, बाबुभाई कंपाऊंड, सायन सेंट्रल रेल्वे, डंकन कॉलनी, हार्बर लाईन (चुनाभट्टी स्टेशन), सोमय्या मैदान असा असून, मुंबईकरांचे जीवनमान सुकर करण्यासाठी हे आणखी एक पाऊल असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
A fish belly shaped elevated corridor, passing through BKC, Babubhai Compound, Central Railway(near Sion),Duncan Colony,Harbour Line (Chunabhatti station),Somaiya ground and lands at EEH, is our yet another step towards bringing ease in living for Mumbaikars!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2019
Have a good drive!
1.6 कि.मी लांबीच्या, 17 मीटर रूंदीच्या आणि चौपदरी अशा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स ते चुनाभट्टी कॉरिडॉरमुळे ठाणे-नाशिक आणि पनवेल-पुण्याकडे जाणारी वाहतूक सुकर होणार आहे. या उड्डाणपूलामुळे आता धारावी आणि सायन जंक्शनदरम्यान वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबईकरांचा प्रवासाचा कालावधी सुद्धा 30 मिनिटांनी कमी होणार आहे.