बीकेसीत डबल डेकर बसची झाडाला धडक
By admin | Published: November 17, 2016 04:37 AM2016-11-17T04:37:18+5:302016-11-17T04:37:18+5:30
वांद्रे पूर्वेकडील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेस्टच्या डबल डेकर बसची झाडाला झालेल्या धडकेत बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात
मुंबई : वांद्रे पूर्वेकडील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बेस्टच्या डबल डेकर बसची झाडाला झालेल्या धडकेत बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
ही बस वांद्रे येथून कुर्ल्याच्या दिशेने जात होती. दरम्यान फॅमिली कोर्टासमोर एका झाडाला या बसची जोरदार धडक लागली, ज्यात या बसच्या वरच्या भागाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसमध्ये असलेले पाच प्रवासी जखमी झाले. सुबोध सिंग (४०), सौराज शेख (१८), मुशरफ शेख (१६), मनीष फरोज (१७) आणि संतालाल फरोज (५१) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, किरकोळ दुखापत असल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बसचालक रमेश पाटील यांना झाडाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या अपघातामुळे बीकेसी परिसरात काही वेळ वाहतूककोंडीची समस्या उद्भवली होती.