बीकेसीचे भाडे तरीही कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 05:25 AM2018-07-12T05:25:51+5:302018-07-12T05:26:07+5:30
मुंबई येथील प्रसिद्ध वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) व्यावसायिक जागेचे भाडे ६५५२ रुपये प्रति चौरस फूट असून ते जगात २६ व्या स्थानी आहे.
मुंबई : येथील प्रसिद्ध वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) व्यावसायिक जागेचे भाडे ६५५२ रुपये प्रति चौरस फूट असून ते जगात २६ व्या स्थानी आहे. मुंबईतीलच नरिमन पॉइंटचा ३७ व्या स्थानी आहे. तेथील हा दर ४९५० रुपये प्रति चौरस फूट आहे.
सीबीआरई या रिअल इस्टेट क्षेत्रातील आंतरराष्टÑीय सल्लागार संस्थेने जगातील सर्वात महाग व्यावसायिक जागांचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात भारतातील तीन जागांचा समावेश आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस या श्रेणीत नवव्या स्थानी आहे. तेथील जागेचे मासिक भाडे १०,४२१ रुपये चौरस फूट आहे.
हाँगकाँग सेंट्रल सर्वात महाग असून तेथील मासिक भाड्याचा दर २०,८४६ रुपये प्रति चौरस फूट आहे. त्यापाठोपाठ लंडनमधील वेस्ट एन्ड, बीजिंगमधील फायनान्स स्ट्रीट, हाँगकाँगमधील कोवलून व बीजिंगमधील सीबीडी यांचा क्रमांक आहे. वास्तवात बीकेसी व नरिमन पॉइंट यांचा क्रमांक घसरला आहे.