Join us

मुंबई इंडियन्ससाठी बीकेटी अधिकृत टायर पार्टनर, रणवीर सिंग ब्रॅण्ड ॲम्बेसेडर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:35 AM

मुंबई इंडियन्सचे प्रवक्ता म्हणाले की, आणखी एका पर्वासाठी बीकेटीसोबतचे सहकार्य कायम राखताना आम्हाला आनंद वाटत आहे.

मुंबई : मुंबई इंडियन्ससाठी टी२० स्पर्धेमध्ये आपले अधिकृत टायर भागीदार म्हणून असलेले स्थान ‘बीकेटी’ने तिसऱ्या पर्वातही कायम ठेवले.या सहकार्याबद्दल घोषणा करताना बालकृष्ण इंडस्ट्रीजचे सहसंचालक राजीव पोद्दार म्हणाले की, आम्हाला सलग तिसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचे अधिकृत टायर भागीदार म्हणून स्थान मिळत असल्याबद्दल प्रचंड उत्साह आणि आनंद वाटत आहे. या महत्त्वाच्या भागीदारीतून बीकेटी आणि मुंबई इंडियन्सने एकत्र येऊन या सर्वाधिक लोकप्रिय आणि भव्य क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राहकांशी आणि आजच्या काळातील युवा पिढीशी संवाद साधणे हे आमचे लक्ष्य आहे. बीकेटी हे जगभरात क्रीडा समारंभ भरविण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

मुंबई इंडियन्सचे प्रवक्ता म्हणाले की, आणखी एका पर्वासाठी बीकेटीसोबतचे सहकार्य कायम राखताना आम्हाला आनंद वाटत आहे. एकनिष्ठता आणि आमच्या भागीदारांसोबत दीर्घकाळ टिकून राहणारे संबंध बनवणे हे आमचे तत्त्व राहिले आहे. 

अभिनेता रणवीर सिंग ब्रॅण्ड ॲम्बेसेडरबीकेटीने त्यांचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून सुपरस्टार रणवीर सिंगची नियुक्ती केली आहे. आम्हाला तरुणांचा आयकॉन रणवीर सिंगसोबत आमच्या ब्रॅण्ड सहयोगाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. त्याने अथक मेहनत व सर्वोत्तमतेच्या माध्यमातून आपले नाव अग्रस्थानावर नेले असल्याने आमच्या ब्रॅण्डसाठी तोच परिपूर्ण निवड आहे, असे पोद्दार म्हणाले.

टॅग्स :मुंबईमुंबई इंडियन्सरणवीर सिंग