काळी-पिवळीही ‘कॅशलेस’च्या मार्गावर

By admin | Published: December 26, 2016 04:58 AM2016-12-26T04:58:15+5:302016-12-26T04:58:15+5:30

नोटाबंदीनंतर मुंबईतील काळ्या-पिवळ््या टॅक्सींच्या उत्पन्नावरही मोठा परिणात होत आहे. चलनाचा तुटवडा व सुट्या पैशांची

Black and yellow also on the path to 'Cashless' | काळी-पिवळीही ‘कॅशलेस’च्या मार्गावर

काळी-पिवळीही ‘कॅशलेस’च्या मार्गावर

Next

मुंबई : नोटाबंदीनंतर मुंबईतील काळ्या-पिवळ््या टॅक्सींच्या उत्पन्नावरही मोठा परिणात होत आहे. चलनाचा तुटवडा व सुट्या पैशांची चणचण, यामुळे चालकांना प्रवाशांना नाकारण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याने, अखेर चालकांसाठी कॅशलेसचा पर्याय निवडण्यावर विचार होत असल्याचे, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला ४0 हजार काळ्या-पिवळ््या टॅक्सी मुंबईत धावतात. अगोदरच टॅक्सींची संख्या कमी असल्याने, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामध्ये नोटाबंदीचा निर्णय झाल्याने, प्रवाशांच्या त्रासात आणखी एक भर पडली. सध्या ५00 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने आणि दोन हजार रुपयांची नोटच उपलब्ध असल्याने, प्रवाशांकडून भाडे देतानाच दोन हजार रुपयांच्या नोटा पुढे केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, सुटे पैसे असल्यास टॅक्सीत बसा, अशी विनवणी चालकांकडून प्रवाशांना केली जात आहे. या सर्व गोंधळामुळे चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. टॅक्सी व्यवसायाला जवळपास ३0 टक्के फटका सहन करावा लागला आहे. खासगी टॅक्सींकडून कॅशलेसचे अनेक वेगवेगळे पर्यायही प्रवाशांना देण्यात आले. त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे प्रवासी खासगी टॅक्सींकडे वळले. या सर्व कारणांमुळे काळ्या-पिवळ््या टॅक्सींसाठी कॅशलेसचा पर्याय निवडण्यावर विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Black and yellow also on the path to 'Cashless'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.