गडकरींविरोधात राज पुरोहितांनी उचलला काळा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:58 PM2018-10-30T12:58:21+5:302018-10-30T12:58:31+5:30

केंद्र सरकार विरोधात मच्छीमारांनी पुकारलेल्या आंदोलनात स्थानिक भाजपा आमदार राज पुरोहित यांनी बंडाचा काळा झेंडा हाती घेतला आहे.

Black flag lifted for fisherman problem by Raj Purohit against Gadkari | गडकरींविरोधात राज पुरोहितांनी उचलला काळा झेंडा

गडकरींविरोधात राज पुरोहितांनी उचलला काळा झेंडा

Next

मुंबई - केंद्र सरकार विरोधात मच्छीमारांनी पुकारलेल्या आंदोलनात स्थानिक भाजपा आमदार राज पुरोहित यांनी बंडाचा काळा झेंडा हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित नौकानयन शिप कॉरिडोर विरोधात कच्छ ते कन्याकुमारीपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात आंदोलन केलं आहे. पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छिमार केंद्र सरकार विरोधात कुलाब्यातील ससून डॉक येथे एकवटले आहेत. समुद्रातील सर्व व्यापारी जहाज अडविण्याचा इशारा मच्छीमार यांनी दिला आहे. या आंदोलनाला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला आहे.

 मच्छीमारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार भाई जगताप आणि आमदार राज पुरोहित या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. काल याच संदर्भात केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत मच्छीमारांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली होती. मात्र मच्छीमारांच्या कोणत्याही मागण्या गडकरी यांनी ऐकून न घेता प्रकल्प होणारच या बाबीवर ते ठाम होते. त्यामुळे केंद्र सरकार विरोधात मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष असल्याची माहिती गणेश नाखवा यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Black flag lifted for fisherman problem by Raj Purohit against Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.