मुंबईकरांना त्रास झाल्यास ठेकेदार काळ्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:39 AM2018-12-23T06:39:00+5:302018-12-23T06:40:00+5:30
विविध उपयोगिता सेवांसाठी रस्ते खोदून मुंबईकरांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारांना अखेर चाप लावण्यात येणार आहे.
मुंबई : विविध उपयोगिता सेवांसाठी रस्ते खोदून मुंबईकरांची गैरसोय करणाऱ्या ठेकेदारांना अखेर चाप लावण्यात येणार आहे. रस्ते खोदल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते उपाय करण्यात आले, यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत. मात्र पालिकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाºया ठेकेदारांवर दंडात्मक अथवा काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होणार आहे.
मुंबईत दूरध्वनी, विद्युत सुविधा, पाइपलाइन गॅस यासारख्या सुमारे
२० बाह्य उपयोगितांसाठी आवश्यकतेनुसार रस्त्यांवर चर खोदले जातात. मात्र एकाच वेळी अनेक रस्त्यांवर चर खोदण्यात येत असल्याने मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत
आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावर
वारंवार चर खोदण्याची परवानगी देण्यात येणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त अजय
मेहता यांनी दिले होते. त्यानुसार कामाच्या ठिकाणी बॅरिकेड्स
बसविले जाऊ लागले. मात्र अनेक ठिकाणी अजूनही पालिकेच्या निकषांनुसार काम होत नसून
रस्ता असमतोल होत आहे.
याची गंभीर दखल घेऊन सर्व उपायुक्तांना चरांची पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
नियम न पाळणाºया ठेकेदारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई
करीत त्यांना काळ्या यादीत
टाकावे, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुंबईत दूरध्वनी, विद्युत सुविधा, पाइपलाइन गॅस यासारख्या सुमारे २० बाह्य उपयोगिता सेवा कंपन्या आहेत.
पाहणी केल्यानंतर याबाबतचा अहवाल महिन्याभरात सादर करण्यास सात परिमंडळीय उपायुक्तांना बजाविण्यात आले आहे.
चाचणी व पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या निकषांनुसार कार्यवाही न करणाºया ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.