Join us  

सेमी फायनलच्या तिकिटांचा काळाबाजार, सोशल मीडियावर ऑफर अन् बरंच काही, एक अटकेत

By मनीषा म्हात्रे | Published: November 13, 2023 8:38 PM

Ind Vs Nz, ICC CWC 2023 Semi Final: क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी सोशल मीडियावर विविध ऑफर देत तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. याच प्रकरणात मालाडच्या तरुणाला जे जे मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आकाश कोठारी (३०) असे आरोपी नाव असून तो चार ते पाच पटीने तिकिटांची विक्री करत होता.

- मनीषा म्हात्रेमुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप सेमी फायनलसाठी सोशल मीडियावर विविध ऑफर देत तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. याच प्रकरणात मालाडच्या तरुणाला जे जे मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. आकाश कोठारी (३०) असे आरोपी नाव असून तो चार ते पाच पटीने तिकिटांची विक्री करत होता.

पोलिस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा ही अतिम टप्प्यात आली असून १५ नोव्हेंबर रोजी भारत विरुध्द न्युझीलंड या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडीयम येथे सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. स्टेडीयमधून प्रत्यक्ष मॅच पाहण्याकरीता देश विदेशातील क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. त्यांना बुक माय शो या पोर्टलवर मॅचची तिकिटे उपलब्ध केलेली आहेत.

११ नोव्हेंबर रोजी आकाश कोठारी नावाची व्यक्ती तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची माहिती जे जे मार्ग पोलिसांना मिळाली. तो भारत विरूध्द न्युझीलंड या सेमी फायनल सामन्याचे तिकीटे त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा चार ते पाच पटीने वाढीव किंमतीने क्रिकेटप्रेमींना विकून, क्रिकेट वर्ल्ड कप तिकीटांचा काळाबाजार करून क्रिकेट सामन्याच्या आयोजकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानूसार, मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे मार्ग पोलीस ठाण्याचे एक पथक तैनात करण्यात आले. आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेत कारवाई केली.  सेमी फायनल सामन्याची तिकीटे कोठून प्राप्त केली याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.  अशी तिकिटे घेवू नका... अनोळखी व्यक्तींकडून अनधिकृतपणे तिकीट खरेदी करू नका.तुमची फसवणूक होऊ शकते. भारत-श्रीलंका सामन्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्येही असे गुन्हे आधीच नोंदवले आहेत. तुम्हालाही बनावट किंवा आधीच स्कॅन केलेली तिकिटे तुम्हाला विकली जाऊ शकतात.- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १ जाहिरातीत काय?जाहिरातीत स्टेडियम मधील वेगवेगळ्या ठिकाणच्या तिकिटांसह जेवण, मद्याबाबत विविध दर ठरवून ऑफर देण्यात आल्या होत्या. त्याबाबतचे संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या आहे. अशा आहेत ऑफर? 

क्रिकेट विश्वचषकउपांत्य फेरी - १ : वानखेडे, मुंबई

तिकिटे:-सुनील गावस्कर लेवल २ - २७,०००गरवारे लेवल ३ - ३३,०००सचिन लेवल ३ - ३२,०००सचिन लेवल  - ४०,०००दिवेचा लेवल २ - ४५,०००गरवारे लेवल १ - ५०,०००

सेमी हॉस्पिटॅलिटी (यूएल फूड बुफे, बीअर आणि वाईन)सचिन तेंडुलकर लेव्हल २ - १,२०,०००दिलीप वेंगसरकर लेव्हल २ - १,२०,०००एमसीए स्तर १ (फूड कूपनसह ज्यामध्ये अन्न आणि मद्य दोन्ही आहेत) - १,००,०००

एसी बॉक्स २.५ लाख पासून (सचिन तेंडुलकर लेवल २ आणि एमसी ए लेवल ३)

११/१२ नोव्हेंबर रोजी हार्ड कॉपीज येतील.बुक करण्यासाठी, आता ५०% लागेल.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपगुन्हेगारीभारत विरुद्ध न्यूझीलंड