Join us

काळाचौकीत रंगली चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:44 AM

काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात सारस फाउंडेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा निकाल शनिवारी अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या सभागृहात मोठ्या थाटामात पार पडला.

मुंबई : काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयात सारस फाउंडेशनने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचा निकाल शनिवारी अभ्युदय एज्युकेशन शाळेच्या सभागृहात मोठ्या थाटामात पार पडला. या वेळी ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या स्पर्धकांमधील विजेत्या स्पर्धकांना माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्याहस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.हेगडे यांनी फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत अशा स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले. या आंतरशालेय स्पर्धेत पाचवी ते नववी इयत्तेमधील एकूण २२ विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक असे बक्षिसाचे स्वरूप होते. सारस फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज म्हेतर यांनी सांगितले की, भायखळा ते माटुंगा परिसरातून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचा आनंद आहे. यापुढे अशाच प्रकारच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राला प्रोत्साहन देणाºया स्पर्धांचे आयोजन फाउंडेशनमार्फत करण्याचा मानस आहे.डॉ. जगन्नाथ हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात निवृत्त मेजरमनोहर भोसले, जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राध्यापकमधुकर मुंडे, लेखिका भावना पेडणेकर-चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.