मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेले रेल्वे पादचारी पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारींत वाढ झाल्याने राज्यमंत्री तथा स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करून देईन, असे आश्वासन कंत्राटदाराने राज्यमंत्री वायकर यांना दिले. कंत्राटदाराने नियोजितवेळी हे काम पूर्ण न केल्यास त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी सूचना वायकर यांनी महापालिकेच्या पूल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.जोगेश्वरी येथील रेल्वे पादचारी पूल, फ्रान्सिसवाडी येथील सेवा रस्त्याचे काम; तसेच रखडलेल्या पुलाच्या कामाची पाहणी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त आनंद वाघ्राळकर, के ईस्ट विभागाचे साहाय्यक आयुक्त सपकाळे, कार्यकारी अभियंता (पूल) प्रतीक ठोसर, नगरसेवक प्रवीण शिंदे, नगरसेविका रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, उपविभाग संघटक शालिनी सावंत, शाखा संघटक नानी नरवणकर, तसेच महापालिकेचे संबंधित कामाचे कंत्राटदार उपस्थित होते.नवलकर मार्केटचीही पाहणीराज्यमंत्री यांनी रेल्वे पुलालगतच असलेल्या नवलकर मार्केटचीही पाहणी केली. येथील गाळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात जवळच्या एखाद्या प्लॉटवर ट्रान्झिट बांधून स्थलांतरित करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली; तसेच नवलकर मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव १५ दिवसांमध्ये तयार करून तो महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशा सूचनाही वायकर यांनी के ईस्टचे साहाय्यक आयुक्त सपकाळे यांना दिली.‘सर्व्हिस रोडचे काम त्वरित सुरू करा’फ्रान्सिसवाडी येथील नाल्यालगत टाकण्यात आलेले डेब्रिज जिल्हाधिकाºयांची परवानगी घेऊन तातडीने उचलून चांदिवली अथवा दहिसर येथे टाकण्यात यावे. तसेच फ्रान्सिसवाडीजवळ आणखी एक मुव्हेबल ब्रिज बांधण्यात यावा व येथील सर्व्हिस रोडचे काम येत्या १५ दिवसांमध्ये सुरू करण्यात यावे, असे निर्देश वायकर यांनी संबंधित अधिकाºयांना दिले.तब्बल १० कोटींचा खर्च अपेक्षित -जोगेश्वरी रेल्वे स्थानकालगत उभारण्यात येणाºया पादचारी पुलाचे भूमिपूजन मागच्या वर्षी करण्यात आले होते. या कामासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काम करताना अनेक अडचणी येत असल्याने कामास विलंब होत होता.यासंदर्भात वायकर यांनी दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष कामाच्या स्थळाची पाहणी करून अडचणी दूर केल्या होत्या. तरीदेखील ज्या वेगाने कंत्राटदाराने हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते, ते होत नसल्याने पुन्हा वायकर यांनी या पादचारी पुलाच्या कामाची पाहणी केली.या वेळी येत्या एप्रिलपर्यंत काम पूर्ण करीन, असे आश्वासन कंत्राटदाराने दिले. हे काम वेळेत पूर्ण न केल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी सूचना वायकर यांनी महापालिकेच्या पूल विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.तारीखनिहाय काम पूर्णत्वाच्या टप्प्यांची यादी महापालिकेला देण्यात यावी, असे आदेश साहाय्यक महापालिका आयुक्त सपकाळे यांनी कंत्रादाराला दिले.
...तर कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा - रवींद्र वायकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:41 AM