घाटकोपर विमान अपघातातील कंपनीच्या कामावर ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:57 AM2018-12-10T05:57:11+5:302018-12-10T05:57:43+5:30
मारिया यांच्या पतीची प्रतिक्रिया; एन्डेमेरचे देखभालीचे काम थांबवले
मुंबई : घाटकोपरविमानअपघातावेळीविमान दुरुस्ती व देखभाल करणाऱ्या एन्डेमेर एव्हिएशन या कंपनीविरोधात केलेल्या विविध आरोपांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अहवालामुळे पुष्टी मिळाल्याची प्रतिक्रिया ‘त्या’ विमानाच्या सहवैमानिक कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी व्यक्त केली.
२८ जून २०१८ रोजी यु-वाय एव्हिएशन या खासगी विमान कंपनीचे विमान घाटकोपरमधील जीवदया गल्लीत कोसळून वैमानिकासह
चार व्यक्ती व एक पादचारी अशा ५ जणांचा मृत्यु झाला होता. किंग एअर सी ९० या प्रकारातील १२ आसनी या विमानाची देखरेख
व दुरुस्ती करणाºया एन्डेमेर या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला होता. बेजबाबदारपणा कारणीभूत अपघातील विमानाची देखरेख हीच कंपनी करत होती त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका बसल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाल्याचे कथुरिया म्हणाले. कंपनीच्या बेजबाबदार कामावर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे ते म्हणाले.
तपासणीदरम्यान आढळल्या गंभीर त्रुटी
डीजीसीएला एन्डेमेरच्या कामकाजाच्या तपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी व अनियमितता आढळल्या व अनेक बाबींची पूर्तता केली जात नसल्याचे समोर आले आहे. कंपनीतर्फे अहमदाबाद येथे सुरु असलेले एअरक्राफ्ट मेंटेनन्सचे पूर्ण काम थांबवण्याचे व मुंबईत सुरु असलेले किंग एअर बी २००, हॉकर ८५०, किंग एअर सी ९० व आॅगस्टा ए १०९ यांचे दुरुस्तीचे काम त्वरित थांबवण्याचे निर्देश डीजीसीएने दिले आहेत. विहित निकषात न बसणारे सामान वापर केल्याबाबत एन्डेमेरच्या प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.