- सागर नेवरेकरमुंबई - वाढती उष्णता, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेपासून थोडा गारवा मिळविण्यासाठी कलिंगड आणि खरबूज या फळांना वाढती मागणी आहे. बाजारात, नाक्या-नाक्यावर कलिंगडाची दुकाने सजली आहेत. गुजरातमधून येणा-या खरबुजाची किंमत कलिंगडपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बरेच ग्राहक कलिंगडाच्या खरेदीला पसंती देत आहेत. दादरच्या बाजारामध्ये किलोच्या हिशोबाने ३० ते ५० रुपयेप्रमाणे कलिंगड विकले जात आहेत.कलिंगड उत्पादकांकडून ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे माल घाऊक व्यापाºयांना विकला जातो. हाच माल किरकोळ व्यापारी १० ते ११ रुपये भावाने खरेदी करतात. सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, जळगाव, बीड जिल्ह्यातून कलिंगड वाशी मार्केटमध्ये येते. शुगर किंग, ब्लॅक बॉय, नामधारी २९५, नामधारी ४५०, मधुबाला ८०, काळे गोड, काळे गूळ इत्यादी विविध प्रकार कलिंगडमध्ये पाहण्यास मिळत आहेत. काळे गोड प्रकाराचे कलिंगड हे कोकणातून येते.वाशी मार्केटमध्ये २८ ते ३२ रुपये किलो भावाने खरबूज किरकोळ विक्रेत्यांना विकले जातो. अहमदनगर, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, जळगाव जिल्ह्यातून खरबुजाचा माल वाशी मार्केटला येतो. गुजरातमधूनही राज्यात मोठ्या प्रमाणात खरबूज येते, अशी माहिती फळविक्रेते संभाजी झांबरे यांनी ‘लोकमत’ला दिली.कलिंगडांची आवकही राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून होत आहे. वाशी मार्केटमध्ये कलिंगडाचा दर किलोमागे ६ ते ११ रुपये असा आहे. सद्यस्थितीमध्ये कलिंगडाच्या किमती कमी असल्या, तरी रमझानमध्ये त्या दुप्पट होतील. होलसेल व्यापाºयांकडून खरेदी करण्यात आलेले कलिंगड किरकोळ व्यापाºयांना मुंबईच्या बाजारात दुप्पट ते तिप्पट किमतींना विकले जात आहे. १०० कलिंगड विकत घेतले, तरी त्यामधील ७० कलिंगडच विकले जातात. कारण काही कलिंगड फुटतात, खराब होतात. त्यामुळे बाजारात किरकोळ व्यापारी ३० ते ५० रुपयाला एका कलिंगडाची विक्री करतात. किरकोळ व्यापारी वाशी मार्केटमध्ये एक ते दोन टनानुसार कलिंगड विकत घेतात. टनासाठी ९ ते १० हजार रुपये मोजले जातात, अशी माहिती फळ व्यापारी शैलेंद्र नलावडे यांनी दिली.ग्रोथ हार्मोन्स रसायनाचा झाडावर मारा करत फळांची वाढ जलद गतीने केली जाते. सुडान रेड (लाल कलर) आणि शुगर याचे मिश्रण इंजेक्शनद्वारे कलिंगडला दिले जाते. परिणामी, कलिंगड आतून लालसर दिसू लागते. कलिंगडमध्ये शुगर असल्याने ते चवीलाही गोड लागते. फळविके्रत्याकडे कलिंगड घ्यायला गेल्यावर तो ते कापून दाखवितो. कलिंगड लालसर दिसले की, ग्राहकसुद्धा आवडीने घेतात. आॅक्सिटॉक्सीन हार्मोन्स फळांमध्ये टाकले जाते. आॅक्सीटॉक्सीन हार्मोनने शरीराची वाढ जलदगतीने होते. ग्रोथ हार्मोन असलेले पदार्थ लहान मुले खातात. ही मुले शरीराने वाढतात, परंतु बुद्धीने कमजोर होतात. ग्रोथ हार्मोनमुळे वयाच्या ८ ते ९ वर्षांमध्ये मुलांची वाढ झालेली दिसून येते. या रासायनिक पदार्थांमुळे मानवी शरीर जलदगतीने वाढू लागते. त्यामुळे कमी वयात शरीराची वाढ झपाट्याने होते आणि वाढत्या वयात म्हातारपण येते.- डॉ. सीताराम दीक्षित, अध्यक्ष,कंझ्युमर गाइडन्स सोसायटी आॅफ इंडिया.वाढत्या उन्हाळ्यामुळे कलिंगडला ग्राहकांची मोठी मागणी आहे. मात्र, इतर फळांना तितकीशी मागणी दिसून येत नाही. किंबहुना, बºयाच फळांचे दर गगनाला भिडल्यामुळे सध्या बाजार संथगतीने सुरू आहे.- शंभुनाथ वर्मा, फळविके्रता.
उकाड्यावर कलिंगडाचा गारवा! दादर मार्केटमध्ये ३० ते ५० असा दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:08 AM