मुंबईत रंगणार अंधांचे क्रिकेट

By admin | Published: January 9, 2016 03:17 AM2016-01-09T03:17:52+5:302016-01-09T03:17:52+5:30

अंधांचा सर्वांगीण विकास आणि समाजप्रबोधन करणाऱ्या ‘द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन’च्या (इंडिया) वतीने मुंबईत ११ ते १३ जानेवारी दरम्यान इस्लाम जिमखाना

Blind cricket will be played in Mumbai | मुंबईत रंगणार अंधांचे क्रिकेट

मुंबईत रंगणार अंधांचे क्रिकेट

Next

मुंबई : अंधांचा सर्वांगीण विकास आणि समाजप्रबोधन करणाऱ्या ‘द ब्लाइंड वेल्फेअर आॅर्गनायझेशन’च्या (इंडिया) वतीने मुंबईत ११ ते १३ जानेवारी दरम्यान इस्लाम जिमखाना आणि विल्सन जिमखाना येथे अंधांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची चुरस रंगणार आहे. देशभरातील अव्वल संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.
या स्पर्धेत भारतातील ८ राज्यांच्या संघांचा समावेश निश्चित झाला असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगेल. उद्घाटनप्रसंगी सिनेअभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर व अभिनेता अंकुश चौधरी यांची उपस्थिती असेल. स्पर्धेचे यंदाचे ८ वे वर्ष असून कोणतेही शासकीय अनुदान नसतानाही ही स्पर्धा गेली सात वर्षे यशस्वीपणे आयोजित होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन ११ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता इस्लाम जिमखाना येथे होईल.

Web Title: Blind cricket will be played in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.